महिलांनी घरीच कापडी मास्क तयार करावेत: वेदांतिकाराजे 

प्रत्येक व्यक्तीसाठी दोन मास्क बनवावेत. एकदा वापरलेला मास्क पुन्हा स्वच्छ धुवून, निर्जंतुक करुनच त्याचा पुन्हा वापर केला जावू शकतो. अशा कापडी मास्कसाठी खर्चही होणार नाही.
vedantikaraje bhosale advice womens to use homemade mask
vedantikaraje bhosale advice womens to use homemade mask

सातारा :  आपल्या साताऱ्यातही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रत्येकाने साथ द्यावी. संसर्ग टाळण्यासाठी महिलांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवून स्वत:ला व कुटूंबियांना कोरोनापासून दूर ठेवावे, असे आवाहन कर्तव्य सोशल गुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोणीही विनाकारण घराबाहेर फिरू नये, प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच खास करुन महिलांनी कोरोनापासून स्वत:चे आणि कुटूंबियांचे रक्षण करण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य आहे. आजच्या घडीला बहुतांश घरांमध्ये शिलाई मशिन उपलब्ध असते. त्यामुळे महिलांनी घरातील कापड स्वच्छ धुवून, निर्जंतुक करुन त्यापासून तीन घड्यांचा मास्क बनवावा. त्यासाठी इलॅस्टीक अथवा नाडीचा वापर करावा. मास्क बनवणे अवघड नाही. त्यामुळे महिलांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवावेत आणि स्वत: आणि कुटूंबातील सर्वांना ते वापरण्याची सक्ती करावी, असे वेदांतिकाराजे यांनी म्हटले आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी दोन मास्क बनवावेत. एकदा वापरलेला मास्क पुन्हा स्वच्छ धुवून, निर्जंतुक करुनच त्याचा पुन्हा वापर केला जावू शकतो. अशा कापडी मास्कसाठी खर्चही होणार नाही. त्यामुळे काळाची गरज ओळखून सर्व महिलांनी घरच्या घरी कापडी मास्क बनवून त्याचा वापर करावा आणि स्वत:ला व कुटुंबियांना कोरोनापासून दूर ठेवावे, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com