‘वंचित’ची नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी समन्वयक

भारिप-बमसंचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिणीकरण करण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकारिणी निवडीसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्याचे समन्वयक म्हणून डॉ. गजानन हुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘वंचित’ची नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी समन्वयक

अकोला - भारिप-बमसंचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिणीकरण करण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकारिणी निवडीसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्याचे समन्वयक म्हणून डॉ. गजानन हुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बमसंचे विलणीकरण करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच घेतला होता. त्यानुसार विधानसभा निवडणूक आटोपताच मुंबईत झालेल्या बैठकीत भारिप-बमसं वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्यात आला. मात्र भारिप-बमसं आणि ‘वंचित’ अशा दोन्ही जिल्हा कार्यकारिणी राज्यात कायम होत्या. विलिणीकरणानंतर नव्याने कार्यकारिणी गठीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. या समन्वयकांकडे जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम - डॉ. गजानन हुले
गोंदिया, भंडारा - चंद्रलाल मेश्राम
यवतमाळ- प्रमोद इंगळे
अमरावती- जितेश राठोड
वर्धा, नागपूर - कुशल मेश्राम
सातारा- हाजी अस्लम
पिंपरी चिंचवड - हैबतपुरे आणि आणिल जाधव
नांदेड, लातूर- बालाजी शिंदे
बीड, उस्मानाबाद - केशव मुद्देवाड
परभणी, हिंगोली- रामचंद्र आईलवार
औरंगाबाद, जालना - डॉ. नितीन सोनावणे

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com