विधानसभेसाठी `वंचित'कडे वाढली इच्छुकांची गर्दी

वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षात घेता विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतीत शंभरावर इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभेसाठी `वंचित'कडे वाढली इच्छुकांची गर्दी

नागपूर : वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षात घेता विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतीत शंभरावर इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली नाही. त्यामुळे वंचित आघाडीने सर्व 48 जागांवर आपले उमेदवार दिले. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतांची टक्‍केवारी चांगली मिळाली. याचा फटका कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा सूर कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काढण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. 

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला 30 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम आघाडी करण्यासाठी दिला आहे. आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र निवडणूक लढण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. 

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी केली असून उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू केल्या. नुकत्याच रविभवन येथे पक्षाचे निवडणूक प्रक्रियेतील सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेश अध्यक्ष अशोक सोनावणे आणि रेखा ठाकूर नागपूर विभागातील मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुखालती घेतल्या. 110 वर इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत इतर पक्षातील नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे. उत्तर नागपूरवर सर्वाधिक लोकांनी दावा केल्याची माहिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com