VBA candidates top in expenditure in panchayat election | Sarkarnama

भारिप-बमसंच्या विजयी उमेदवारांची निवडणूक खर्चात आघाडी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अकोला - नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत अकोला तालुक्यातून निवडणूक लढवणाऱ्या भारिप-बमसंच्या (अर्थात वंचित बहुजन आघाडी) विजयी उमेदवारांनी प्रचार खर्चात आघाडी घेतली आहे.

अकोला - नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत अकोला तालुक्यातून निवडणूक लढवणाऱ्या भारिप-बमसंच्या (अर्थात वंचित बहुजन आघाडी) विजयी उमेदवारांनी प्रचार खर्चात आघाडी घेतली आहे. अकोला तालुक्यातील १० जागांपैकी सहा जागी भारिपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून निवडणूक खर्चात सुद्धा इतरांना मागे टाकले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून उतरलेल्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाने ४ लाख खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंतच्या खर्चाचा रोजचा व प्रत्येक गोष्टीच्या खर्चाचा हिशोब निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना द्यावा लागला. परंतु त्यानंतर सुद्धा अकोला तालुक्यातून निवडणूक लढवणाऱ्या ५३ उमेदवारांपैकी २ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. 

उमेवादारांना खर्च सादर करण्याची माहिती दोनदा नोटीस बजावून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर केला नाही. परंतु निवडणुकीचा निकाल लागण्यानंतर ३० दिवसांच्या उमेदवारांना त्यांच्या जमाखर्चाचा अंतिम अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सादर करावा लागतो. परिणामी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या रिंगणात भविष्य आजमावलेल्या उमेदवारांनी ७ फेब्रुवारीरोजी त्यांच्या खर्चाचा अंतिम तपशील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सादर केला. त्यानुसार अकोला तालुक्यातून विजयी झालेल्या भारिपच्या सहा उमेदवारांनी निवडणूक खर्चात आघाडी घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना व एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक खर्चात आघाडी घेतली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख