कनिकाच्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या वसुंधरराजे व त्यांचा मुलगाही एकांतवासात. - vasundharraje and his quarantine after attended party of kanika | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

कनिकाच्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या वसुंधरराजे व त्यांचा मुलगाही एकांतवासात.

पीटीआय
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची गायिका कनिका कपूर हिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून उपचारासाठी तिला पूर्णपणे एकांतवासात ठेवण्यात आले आहे.

ती दहा दिवसांपूर्वी ब्रिटनहून विमानाने लखनौला आली होती. त्यानंतर तिला ताप आला होता. तिने स्वत:ची तपासणी करून घेतली असता तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. दरम्यान, कनिकाने आयोजित केलेल्या

मेजवानीस उपस्थित राहणारे तीन बड्या राजकीय नेत्यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कनिका आणि तिच्या कुटुंबीयांना एकांतवासात ठेवण्यात आले असून दरम्यानच्या काळात कनिका ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली होती, त्यांचाही शोध घेऊन तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी करताना कनिकामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती. मात्र, चार दिवसांपूर्वी तिला ताप आल्यावर उपचार सुरू करण्यात आले.

वसंधुराराजे एकांतवासात
कनिका कपूर हिने आयोजित केलेल्या मेजवानीस मुलगा दुष्यंतसोबत उपस्थित राहणाऱ्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनीही एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पुत्र दुष्यंत यांनीही तोच कित्ता गिरवला असून खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही स्वत:हून एकांतवासात जात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन हे देखील या मेजवानीस उपस्थित होते, त्यांनीही एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख