vasundhararaje corona report negative | Sarkarnama

वसुंधराराजेेंची इम्युनिटी पाॅवर जबरदस्त! #KanikaKaCoronaCrime

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 मार्च 2020

कनिका कपूरने उडवलीय अनेकांची झोप

पुणे : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरराजे शिंदे आणि त्यांचे चिरंजीव दुष्यंतसिंह यांची रोगप्रतिबंधकारक शक्ती जोरात आहे. त्यामुळे त्यांच्यावर बॉलिवूडमधील ‘बेबी डॉल’ फेम गायिका गायिका कनिका कपूरच्या संसर्गाचा काही परिणाम झाला नाही. त्यामुळे त्या दोघांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. 

 कनिकाच्या संसर्गाने अनेक राजकीय नेते काळजीत पडले आहेत. कनिकाच्या संपर्कात आलेल्या अनेकांनी आणि तिच्या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला. संसर्गाची ही साखर राष्ट्रपीत रामनाथ कोविंद यांच्यापर्यंत पोहोचली होती. कारण दुष्यंतसिंह हे कोविंद यांना भेटले होते. 

कनिकाला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. तिच्या संपर्कात दुष्यंत सिंग, वसुंधराराजेंसह बडे नेते-अधिकारी आले होते. त्यांनाही करोनाची लागन झाल्याचा संशय होता. त्यामुळे या दोघांसह अनेकांनी स्वतःला क्वॉरंटाइन करून घेतलं होतं. आता भाजपा खासदार दुष्यंत सिंग आणि वसुंधरा राजे यांना करोना रिपोर्ट आला आहे.

स्वतःला फ्लूची लक्षणं असताना कनिकाने 17, 18 अन 19 ह्या तीन दिवस तीन मोठ्या पार्ट्या अटेंड केल्या होत्या. एक पार्टी उत्तर प्रदेशच्या माजी खासदाराने आयोजित केली होती. ह्या पार्टीमध्ये वसुंधराराजे यांचे चिरंजीव दुष्यंन्त सिंग, उत्तरप्रदेशचे आरोग्य मंत्री, आजी माजी खासदार, सरकारी नोकर हजर होते.खासदार दुष्यं सिंग यांनी नंतर दिल्लीला जाऊन संसदेच्या अधिवेशनाला हजेरी लावली. नंतर दुष्यंत सिंग यांनी उत्तरप्रदेश व राजस्थानच्या खासदारांसाठी राष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी ठेवलेल्या डिनरसाठीही हजेरी लावली होती.

कनिका कपूरला करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट होताच तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच करोनाचा धसका घेतला होता. त्यातील काहींनी स्वतःला क्वॉरंटाइन करून घेतलं होता. त्यात दुष्यंत सिंहही होते. त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच त्यांना करोनाची लागण झालेली नाही.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख