वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निलंबित

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी प्रशासकीय मंडळ बरखास्तीबरोबरच करून बाजार समितीच्या सचिवांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा सरकारने आज विधानसभेत केली. वाशीम जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमल्यानंतर मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निलंबित

मुंबई : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी प्रशासकीय मंडळ बरखास्तीबरोबरच करून बाजार समितीच्या सचिवांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा सरकारने आज विधानसभेत केली. वाशीम जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमल्यानंतर मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. 

याप्रकरणी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या भ्रष्टाचाराप्रकरणी काय कारवाई केली असा प्रश्न आमदार सुनील देशमुख यांनी विचारला. हे प्रकरण न्यायालयात असून सचिवांनी कागदपत्रे दिली नाहीत, असं उत्तर पणनमंत्री राम शिंदे यांनी दिले. या उत्तरावर आक्षेप घेत सरकारचे सचिव ऐकत नाहीत, जे सचिव सरकारचे ऐकत नाहीत त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांनी मंत्र्यांना केला आणि सचिवांच्या निलंबनाची मागणी केली. यावरून झालेल्या गोंधळानंतर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळ बरखास्त करून सचिवांना निलंबित करण्याची घोषणा राम शिंदे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com