vasantrao phalke about shalinitai politics | Sarkarnama

शालिनीताई पुन्हा राजकारणात येतील : वसंतराव फाळके 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 डिसेंबर 2018

रवी साळुंखे यांनीही ताईंना कोरेगावातून बिनविरोध निवडून द्यावे, अशी मागणी केलेली आहे.

सातारा : कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील या सध्यातरी राजकारणापासून अलिप्त आहेत. पण आगामी काळात कोरेगाव तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला तर त्या पुन्हा राजकारणात येतील, असे स्पष्ट संकेत त्यांचे बंधू वसंतराव फाळके यांनी दिले.

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनीही ताईंना कोरेगावातून बिनविरोध निवडून द्यावे, अशी मागणी केलेली आहे.

डॉ. शालिनीताई पाटील यांनी मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, हे लक्षात घेऊन या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भुमिका घेतली, असे सांगून फाळके म्हणाले, त्यांनी विधानभवनातही आवाज उठविला.
सामान्य माणसाला ही त्यांची भुमिका आवडली पण नेते मंडळीला ही भुमिका आवडली नाही. कोणीही त्यांच्या भुमिकेला पाठींबा दिला नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून क्रांतीसेना संघटनेची उभारणी केली. आज सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यावेळी ताईंनी केलेल्या उठावाला फळ आले आहे. आरक्षण मिळाले म्हणून राज्यभर सर्वत्र आनंद व्यक्त केला गेला. यानिमित्ताने ताईंची सर्वांनाच आठवण झाली. यातूनच त्यांच्या सत्काराची कल्पना पुढे आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख