WHO च्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील पहिले हॅन्ड सॅनिटायझर सांगलीत तयार!

कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी नफ्याचा विचार न करता सॅनिटायझर बनवले जात आहे. त्याचे नागरिकांना मोफत वितरण केले जाणार आहे."- विशाल पाटील (अध्यक्ष, वसंतदादा कारखाना)
vasantdada suger factory
vasantdada suger factory

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्स निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची पहिली बॅच तयार केली आहे. 99 टक्के प्युअरिटीचे अल्कोहोल असलेले जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशा नुसार तयार झालेले महाराष्ट्रातील पहिले हॅन्ड सॅनिटायझर आहे. 'आय एम टीम विशाल' नावाने ते बाजारात आणले आहे.

कोरोनाचा प्रसार वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. साखर कारखान्यात निर्माण होत असलेल्या अल्कोहोलपासून सॅनिटायझर निर्मिती करण्याबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी तातडीने सॅनिटायझर निर्माण करण्याबाबत निर्णय घेतला.

वसंतदादा कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये गुरुवारपासून सॅनिटायझर निर्मितीस प्रारंभ झाला. अर्धा लीटर ते पाच लीटर बाटलीमध्ये सॅनिटायझर बनवले जात आहे. आज पहिली बॅच बाहेर पडली.  'आय एम टीम विशाल' या नावाने ब्रॅन्ड बनला असुन 'जॉईन टीम विशाल' असे आवाहन बाटलीवरील स्टीकरवरुन केले आहे. विशालदादा युवा प्रतिष्ठानतर्फे या सॅनिटायझरचे मोफत वितरण केले जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना मोफत वितरण करण्यासाठी प्रतिष्ठानने यंत्रणा उभारली आहे. वसंतदादा कारखान्यामार्फत उत्पादन घेतले जाणार आहे. दररोज पाचशे बाटल्या उत्पादीत केल्यानंतर त्याचे जिल्हाभर वितरण केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com