महायुतीने सरकार स्थापन करावे यासाठी कॉंग्रेसच्या पुरकेंचे आंदोलन

महायुतीने सरकार लवकर स्थापन करावे, यासाठी कॉंग्रेसचे नेते, माजी शिक्षण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार प्रा. वसंत पुरके यांनी आज सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळात राळेगाव येथे धरणे आंदोलन केले.
महायुतीने सरकार स्थापन करावे यासाठी कॉंग्रेसच्या पुरकेंचे आंदोलन

नागपूर ः महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेचा कौल देऊन 11 दिवस उलटले. तरीही मुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती मिळविण्यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये टोकाचे वाद सुरु आहेत आणि हे त्रांगडे सुटलेले नाही. महायुतीने सरकार लवकर स्थापन करावे, यासाठी कॉंग्रेसचे नेते, माजी शिक्षण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार प्रा. वसंत पुरके यांनी आज सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळात राळेगाव येथे धरणे आंदोलन केले.

मरणासन्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी तरी आता भांडणे थांबवा, अशी आर्जव प्रा. पुरकेंनी आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना केली. सद्यस्थितीत असलेले सरकार हे काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेताना अनेक अडचणी येतात. 

आर्थिक विषयांत निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन ते घ्यायचे असतात. त्यासाठी नवीन सरकार तात्काळ स्थापण होणे गरजेचे आहे. आधी अतिवृष्टीने आणि आता परतीच्या पावसाने शेतकरी कमालिचा अडचणीत सापडला आहे. अशा वेळी खुर्चीसाठी भाडत राहाणे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे जनतेचा कौल प्राप्त झालेल्या नेत्यांना शोभत नाही. 

जनतेच्या त्यांच्यावरील रोष दिवसागणिक वाढतो आहे. त्याचा उद्रेक होण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला गती द्यावी. शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट लक्षात घेता महायुतीच्या नेत्यांनी आपसातील भांडणे मिटवून लवकर सत्ता स्थापन करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रा. पुरके यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com