आमदार औटींना धक्‍का, पारनेरची सत्ता अपक्षांनी हिसकावली! 

आमदार औटींना धक्‍का, पारनेरची सत्ता अपक्षांनी हिसकावली! 

पारनेर (नगर) :पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी वर्षा नगरे यांची निवड तर उपनगराध्यक्ष पदी चंद्रकांत चेडे यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून वैशाली आनंदा औटी यांनी तर अपक्ष गटाकडून वर्षा शंकर नगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक दत्तात्रय कुलट तर बंडखोर गटाकडून चंद्रकांत चेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

आज दुपारी ठीक दीड वाजता शिवसेना नगरसेवक अनिकेत औटी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली औटी, दत्ताञय कुलट, सिमा औटी, किसन गंधाडे, मुदस्सर सय्यद, नंदा देशमाने अशा सात सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. बंडखोर गटाचे नऊ सदस्य पावणे दोनच्या सुमारास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वर्षा नगरे यांच्या सह चंद्रकांत चेडे, सुरेखा भालेकर, मालन शिंदे, नंदकुमार औटी, विशाल शिंदे, संगिता औटी, शशिकला शेरकर, विजेता सोबले या नऊ सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड झाली. 

निवडीच्या वेळी या दोन्ही गटाच्या वतीने हात वर करून मतदान झाले. या वेळी बंडखोर गटाच्या नगरे यांना नगराध्यक्षपदासाठी नऊ तर औटी यांना सात मते मिळाली. त्यामुळे नगरे यांची निवड जाहीर झाली त्यानंतर ऊपनगराध्यक्षपदासाठी चेडे यांना नऊ तर कुलट यांना सात मते मिळाल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी चेडे यांची निवड जाहीर करण्यात आली. पारनेर नगरपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून गेली आडीच वर्ष आमदार औटी यांची असलेली सत्ता ऊलथून टाकण्यात अपक्षांसह बंडखोर नगरसेवक यशस्वी झाले आहेत. 

दरम्यान नगरपंचायतीचे पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती नंदकुमार देशमुख यांनी या निवडीसाठी दांडी मारली. त्याचा परिणाम शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले आहे. देशमुख आजारी असल्याचे कारण सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com