मनसेच्या उद्याच्या वर्धापनदिनाकडे अनेकांचे लक्ष, वर्धापनदिन नवी मुंबईत

..............
मनसेच्या उद्याच्या वर्धापनदिनाकडे अनेकांचे लक्ष, वर्धापनदिन नवी मुंबईत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्याचा (9 मार्च) 14 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमास राज्यभरातून मनसैनिक येणार असून यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमके काय बोलणार आहेत, याकडे मनसैनिकासह राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. राज यांच्याप्रमाणे भाजपने काही दिवसांपूर्वी प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले होते. भाजप पाठोपाठ मनसेने देखील नवी मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे हे दोन्ही पक्ष नवी मुंबईसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत एकत्र येणार का ? याकडे लक्ष लागले आहे. 

राज यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक बोलावून कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर आता नवी रणनीती आखली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अधिवेशन नवी मुंबई येथे होत आहे. त्यानुसार यंदा पक्षाचा वर्धापन दिन मुंबईबाहेर साजरा होणार आहे. नवी मुंबईतील विष्णूदास भावे नाट्यगृहात मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या 23 जानेवारीत मनसेचे महाअधिवेशन आयोजित केले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले होते. त्या अधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवून अमित यांना नेतेपद बहाल केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com