vankya naidu, vicepresident candidate | Sarkarnama

गेल्या चाळीस वर्षाचे ऋणानुबंध तुटले 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

नवी दिल्ली : "" माझी कौटुंबिक पार्श्‍वभूमी शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्याच्या एका सामान्य माणसाला लोकांचा आणि भाजपचा पाठिंबा मिळाल्याने मी राजकारणात पुढे आलो. आजपर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करता आले. मात्र आजपासून मी भाजपपासून वेगळा होत आहे. माझी भूमिका वेगळी असेल; असे असे मनोगत  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपराष्ट्रपतीपदाचे "एनडीए'चेउमेदवार व्यंकय्या नायडू यांनी आज येथे काढले. 

गेल्या चार दशकाहून अधिक काळ राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेले नायडू हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. येत्या 5 ऑगस्टरोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडील सर्व मंत्रीपदाचे राजीनामे त्यांनी काल(सोमवार) दिले होते. आज (मंगळवार) व्यंकय्या नायडू यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. गेल्या चाळीस वर्षाचे ऋणानुबंध तोडताना नायडू काहीसे भावनाविवश झाले होते. गेल्या अनेक वर्षापासून जनसंघ त्यानंतर भाजप या आपल्या प्रिय पक्षासाठी बऱ्याच खसता खाल्या आहेत. आजपर्यंत केवळ भाजप सोडून त्यांनी कधी कुठल्या पक्षाचा विचारही केला नाही. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलेल्या नायडू यांनी आपल्या राजकीय वाटचालीच्या आठवणींना उजाळा दिला. 

उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नायडू म्हणाले, "" आजपासून मी भाजपचा नसेन. पक्षांने मला खूप काही दिले. मी पक्षाच्या हितासाठी नेहमीच संघर्ष करीत आलो. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ आले आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहता आले. राजकारणाबरोबरच समाजकारण करताना लोकांनीही मला साथ दिली. मी मंत्रीपदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असला तरी खासदारपद सोडलेले नाही. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडेपर्यंतच मी खासदार असणार आहे. सर्वोच्चपदावर पोचल्यानंतर संविधनाचे पालन करणे आणि न्याय देणे या गोष्टींना माझे प्राधान्य असेल.'' 

दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमीत शहा यांचा आभारी आहे असे नायडू यांनी शेवटी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख