कुठं गेलं रक्त? प्रणिती शिंदे यांच्यासमवेत दिशा पिंकी शेख 'डिबेट' करणार!

वडिलांची राजकीय बेरोजगारी आणि मंत्रीपदाच्या हुलकावणीमुळे उद्विग्न मनस्थितीत असलेल्या प्रणितीताई बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांचे वक्तव्य बालिश आणि हास्यास्पद आहे.
vanchit challenges praniti shinde for debate
vanchit challenges praniti shinde for debate

पुणे: कुठं गेलं रक्त? असे म्हणून प्रकाश आंबेडकरांना झोंबणारी टीका करणाऱ्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना वंचित आघाडीने झणझणीत प्रतिउत्तर दिले आहे. प्रणिती शिंदे यांची संभावना 'बालिश' अशी करत त्यांना दिशा शेख यांच्याबरोबर 'डिबेट' करण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

काल सोलापुरात प्रणिती शिंदे यांनी सीएए, एनआरसीसंदर्भात बोलत असताना वंचितवर जहरी टीका केली. आता कुठे आहे रक्त? असा बोचणारा सवाल केला होता. त्याला वंचितचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी आज उत्तर दिले आहे. 

पातोडे यांनी म्हटले आहे की, वडिलांची राजकीय बेरोजगारी आणि मंत्रीपदाच्या हुलकावणीमुळे उद्विग्न मनस्थितीत असलेल्या प्रणितीताई बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांचे वक्तव्य बालिश आणि हास्यास्पद आहे.  

देशातील लोकशाही वाचविण्याची कुवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तात आहे. अन्यथा राज्य व केंद्रात कुठल्याही सत्तेत नसलेले 'प्रकाश आंबेडकर' यांनाच त्यांनी प्रश्न का केला असता? अर्थात काँग्रेसचे राज्य नेतृत्व कुचकामी आहे, लढण्याची कुवत गमावून बसलाय याची खात्री त्यांना पटलेली दिसते. मृतप्राय झालेले काँग्रेसचे 'मढे' लढणार नसल्याची खात्री करूनच त्यांनी प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याची अपेक्षा व्यक्त केलीय असे समजू, असा टोला पातोडे यांनी लगावला आहे. 

राज्यात व देशात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात एखादी डिबेट लावावी. आमच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांना पाठवून प्रणिती यांच्या ज्ञानात भर घालायला आम्ही तयार आहोत. आपल्या पक्षाच्या एनआरसी, सीएए व एनपीआर बाबतच्या भूमिका व रक्तातील नात्यांची मोदी, संघ, भाजपा बाबतची राजकीय बांधिलकी यावर उत्तरे द्यायला सज्ज असावे, अशी अट त्यासाठी असल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com