'वंचित' आघाडीने केला घंटानाद; 'इव्हीएम' हटवा अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार 

निवडणूक मतदान यंत्रांविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांच्या आवारात घंटानाद करीत जोरदार घोषणाबाजी केली. मतदान प्रक्रीयेतून 'इव्हीएम' बाद करा, जोपर्यंत मतपत्रिकेवर मतदान होत नाही तोपर्यंत निवडणूक मतदान प्रक्रीयेत आमचा पक्ष सहभागी न होता बहिष्कार घालीन असा इशारा यावेळी देण्यात आला.
'वंचित' आघाडीने केला घंटानाद; 'इव्हीएम' हटवा अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार 

नाशिक : निवडणूक मतदान यंत्रांविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांच्या आवारात घंटानाद करीत जोरदार घोषणाबाजी केली. मतदान प्रक्रीयेतून 'इव्हीएम' बाद करा, जोपर्यंत मतपत्रिकेवर मतदान होत नाही तोपर्यंत निवडणूक मतदान प्रक्रीयेत आमचा पक्ष सहभागी न होता बहिष्कार घालीन असा इशारा यावेळी देण्यात आला. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दुपारी बाराला जमलेल्या कार्यकर्ते, नेते व पदाधिकाऱ्यांनी घंटानाद करीत निवडणूक प्रक्रीयेतील मतदानयंत्रांचा वापर संशयास्पद आहेत. त्यामुळे मतदार, नागरीकांचा लोकशाहीवरील विश्‍वास कमकुवत होतो. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. विशेषतः नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपुर्ण 'व्हीव्हीपॅट' पत्रिकांची मोजणी व्हावी ही आमची मागणी होती. त्याची पूर्तता झाली नाही. 

नागरीक व कार्यकर्ते यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, सरकारकडून त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. हे योग्य नाही. त्यामुळे जोपर्यंत मतदानपत्रिकेद्वारे निवडणूक होत नाही. तोपर्यंत सर्वांचा निर्मळ सहभाग व पारदर्शी कारभार होणार नाही. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आले. पुढील निवडणुका मतपत्रिकेवर न झाल्यास आम्ही त्या विरोधात आंदोलन करु. मतदान प्रक्रीयेत भाग न घेता बहिष्कार टाकू असा इशारा यावेळी देण्यात आला. असेच आंदोलन चांदवड व अन्य ठिकाणीही झाले. यावेळी वामन गायकवाड, विभागीय अध्यक्ष पवन पवार, डॉ. संजय जाधव, नितीन भुजबळ, अरुण शेजवळ, ताराचंद मोतवाल, भिवानंद काळे यांसह मोठ्या संख्येने नेते सहभागी झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com