Vanchit Aghadhi To Field Nathabhau Shewale from Shirur | Sarkarnama

आंबेगाव-शिरुरमध्ये वंचित विकास आघाडीतर्फे नाथा शेवाळे यांची उमेदवारी?

भरत पचंगे 
बुधवार, 12 जून 2019

आंबेगाव-शिरुर मधून शिवसेनेकडून नेमके कोण याबाबत उत्सुकता असतानाच आता बहुजन वंचित आधाडीकडून जनतादल (सेक्यूलर) पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली असून दोन्ही प्रस्थापितांना घरी बसविण्याच्या इराद्याने काम सुरू केल्याची माहिती स्वतः यांनी दिली. पर्यायाने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे तीन तेरा वाजविलेल्या वंचित विकास आघाडीने पहिला बॉंब आंबेगाव-शिरुरमध्ये टाकून आढळराव आणि वळसे-पाटील या दोन्ही नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा इशारा निवडणूक जाहीर होण्याआधीच दिला आहे. 

शिक्रापूर : आंबेगाव-शिरुर मधून शिवसेनेकडून नेमके कोण याबाबत उत्सुकता असतानाच आता बहुजन वंचित आधाडीकडून जनतादल (सेक्यूलर) पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली असून दोन्ही प्रस्थापितांना घरी बसविण्याच्या इराद्याने काम सुरू केल्याची माहिती स्वतः यांनी दिली. पर्यायाने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे तीन तेरा वाजविलेल्या वंचित विकास आघाडीने पहिला बॉंब आंबेगाव-शिरुरमध्ये टाकून आढळराव आणि वळसे-पाटील या दोन्ही नेत्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा इशारा निवडणूक जाहीर होण्याआधीच दिला आहे. 

लोकसभा निवडणुकीत तीन पंचवार्षीक नंतर खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराभव पचवावा लागला. हा पराभव त्यांचेच पूर्वाश्रमीचे मित्र व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीच केल्याचा होरा त्यांचा आहे. पर्यायाने येत्या विधानसभा निवडणूकीत वळसे पाटलांसमोर उभे राहण्याची किंवा आपला मुलगा उद्योजक अक्षय आढळराव यांना उमेदवारी देण्याची व्यूहरचना एव्हाना आढळराव यांची सुरू असल्याची चर्चा आहे. अर्थात निवडणूका अजुन जाहिर व्हायला अवधी असल्याने दोन्ही बाजुंनी उमेदवारीबाबत जेवढी काही गुप्तता पाळता येईल तेवढी पाळली जात असताना इकडे वंचित विकास आघाडीने मात्र शिरुर-आंबेगावमध्ये डोके वर काढले आहे. आघाडीकडून जनता दल सेक्यूलरचेचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना उमेदवारी दिल्याची माहिती खुद्द शेवाळे यांनी दिली. याबाबत पक्षाची आणि वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचेशी चर्चा करुनच आपण उमेदवार म्हणून काम सुरू केल्याची माहितीही शेवाळे यांनी दिली. 

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत वंचित विकास आघाडीच्या राजकीय भूमिकेचा फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादीला बसल्याचे जगजाहिर आहे. त्यातच पहिल्यांदा उमेदवारी जाहिर करुन इतर सर्वच पक्षांच्या इच्छुकांची राजकीय कोंडी करण्याची अभिनव पध्दत वंचित विकास आघाडीची आहे.तीच पध्दत शेवाळे यांच्या निमित्ताने वापरल्याचे या उमेदवारीवरुन सिध्द होत असून लवकरच आघाडीच्या नेत्यांसमवेत संपूर्ण मतदार संघात मतदार संपर्क अभियान राबविणार असल्याची माहिती श्री शेवाळे यांनी दिली. 

आंबेगाव तर खरा जनता दलाचाच!
खासदार आणि आमदार अशा दोन्ही ठिकाणी आंबेगावचे प्रतिनिधीत्व केलेले दिवंगत जनता दलाचे नेते किसनराव बाणखेले यांचे निमित्ताने आंबेगावमध्ये जनता दल वाढले. मात्र त्यांचा राजकीय घात करुन त्यांना संपविण्याचे कुटील डाव आंबेगावमधूनच शिजले. मात्र जनता दल हे मुळ आंबेगावचे असून त्याला राजकारणापूरत्या वापरल्या जाणा-या शिरुरच्या ३९ गावांची साथ मिळविण्याबाबतची चर्चा डॉ.आंबेडकर यांचेशी झाली असून यावेळी जनता दलाचा आमदार होईल असे काम सुरू केल्याचे यावेळी शेवाळे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी-शिवसेनेचे इच्छुक संपर्कात
विधानसभेसाठी पात्र असे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्यांना आंबेगावचे दोन्ही नेते उमेदवारी मिळू देणार नाहीत हे त्यांनाही ठाऊक आहे. त्यामुळे हे जवळपास पाच इच्छुक आमच्या संपर्कात असून हेच पाच जण आंबेगावचा निकाल वंचित विकास आघाडीसारखा लावतील असा दावाही यावेळी शेवाळे यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख