वंचित विकास आघाडी पुन्हा काॅंग्रेसला ठेंगा दाखविण्याच्या तयारीत

वंचित विकास आघाडी पुन्हा काॅंग्रेसला ठेंगा दाखविण्याच्या तयारीत

मुंबई ः वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केल्याचे आघाडीचे कार्यलयीन सचिव रतन बनसोडे यांनी कळवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर सर्व 288 मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले. 

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे दोन्ही कॉंग्रेसचे किमान दहा उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे युतीच्या विरोधात सर्व लहान मोठया पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही कॉंंग्रेसने घेतला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित आघाडी भाजपची बी टिम असल्याची टिका कॉंग्रेसने केल्याने आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर खवळले आहेत. कॉंग्रेसने आधी या आरोपाचा खुलासा करावा आणि त्यानंतरच विधानसभेसाठी चर्चा होईल, अशी अट आंबेडकर यांनी घातल्याने आघाडीची शक्‍यता मावळल्यात जमा आहे.

अखेर वंचित आघाडीने राज्यातील सर्व जागांसाठी ईच्छुक असणा-या उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केल्याने आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत. या संदर्भात ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, आणि कोकण विभागाच्या संदर्भात उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले गेले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी जय्यत तयारी करीत असून ह्या तयारीचाच भाग म्हणून मुंबई जिल्हा, ठाणे आणि कोकण विभागातील (पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) या ठिकाणच्या सर्व समाजातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 19 ते ऑगस्ट 21 या तारखां दरम्यान अण्णाराव पाटील, अशोकभाउ सोनोने, रेखाताई ठाकूर, किसन चव्हाण ह्या संसदीय मंडळ समितीच्या वतीने मुंबईत मुलाखती होतील. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com