वाल्हे गाव दुर्गाडे सरांचेच; पंचायत समिती माजी सभापतींचा दारूण पराभव 

वाल्हे गाव दुर्गाडे सरांचेच; पंचायत समिती माजी सभापतींचा दारूण पराभव 

वाल्हे  : येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सरपंचपदासह तब्बल सात जागा जिंकून शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या सरपंचपदाचे उमेदवार माजी सभापती गिरीश पवार यांचा राष्ट्रवादीचे अमोल खवले यांनी दणदणीत पराभव केला. शिवसेनेचे चार सदस्य निवडून आले; तर भाजपला भोपळा देखील फोडता आला नाही. 


संपूर्ण पुरंदर तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या वाल्हे ग्रामपंचायतीचा गड अखेर दुर्गाडे यांनी राखला असून, नव्याने स्थापन झालेल्या सुकलवाडी गावावर राष्ट्रवादी; तर वागदरवाडी व आडाचीवाडी या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आली. मात्र, राज्यात व देशात सत्तेत असलेल्या भाजपला भोपळा देखील फोडता आला नाही.

 
वाल्हे गावाचे विभाजन होऊन नव्याने तीन गावे अस्तित्वात आली होती. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी सत्ता राखणार की पायउतार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डॉ. दुर्गाडे यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याशी केलेल्या आघाडीमुळे राष्ट्रवादीला वाल्ह्यात सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. खवले यांनी गिरीश पवार यांचा 823 एवढ्या उच्चांकी मतांनी दारुण पराभव केला. निकाल जाहीर झाल्यानंतर डॉ. दुर्गाडे व नवनिर्वाचित सरपंच अमोल खवले यांना खांद्यावर उचलून गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला.

 
श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : चंद्रशेखर दुर्गाडे, सुरेखा तानाजी भुजबळ, दीपाली शांताराम भोसले, अंजली दीपक कुमठेकर, चित्रा साधू जाधव, सूर्यकांत ज्ञानेश्वर भुजबळ. 
श्री भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सुनीता मोहन ढोबळे, प्रकाश विठ्ठल पवार, इक्‍बाल सुलेमान आतार, हनुमंत पवार. अपक्ष: वैशाली दादासाहेब पवार. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com