आमदार वैभव पिचड यांचा भाजपप्रवेश निश्चित

आमदार वैभव पिचड यांचा भाजपप्रवेश निश्चित

नगर : अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकण्याचे निश्चित केले असून, उद्या (ता. २७) याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. याबाबत आज अकोले येथे कार्यकर्त्यांच्या बैठकित त्यांनी हा निर्णय जाहीर केला व तालुक्याच्या विकासासाठी आपण हा कठोर निर्णय घेत असल्याचे बैठकित बोलताना सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीजाजी जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे पाठविले आहेत. आमदार पिचड गेल्या तीन-चार दिवसांपासून भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठका होऊन त्यांनी चर्चा केली. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, हे निश्चित झाले होते. आजच्या बैठकीमुळे त्याला मूर्त रुप आले.
 
बैठकित मार्गदर्शन करताना पिचड म्हणाले, ``आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपणास काळजावर दगड ठेवून निर्णय घेत आहोत. गेल्या पाच वर्षात तालुक्याला पुरेसा विकास निधी मिळू शकला नाही, त्यामुळे तालुका उजाड होण्याची भीती निर्माण झाली आहे. निळवंड्याचे प्रश्न आहेत. आदिवासींना रोजगाराचा प्रश्न आहे. अशीच परिस्थिती आगामी काळातही होऊ नये, यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी गेल्या चाळीस वर्षांत तालुक्यात विकासाची गंगा आणली असली, तरी नवीन प्रश्न सोडविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच सर्वच नेत्यांनी आपल्याला चांगली साथ दिली, मात्र तालुक्याच्या विकासासाठी कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com