15 दिवसात 17 तलाठी देणार  : वैभव नाईक

..
vaibhav naik
vaibhav naik

कुडाळ: तालुक्‍यात येत्या 15 दिवसांत तलाठ्याची17 रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. 


अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नाईक प्रयत्न करत आहेत. एकही शेतकरी नुकसानीपासून वंचित राहता नये. 

त्यानुषंगाने प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांचा आढावा घेण्यासाठी आज नाईक यांनी येथील तहसील कार्यालयात भेट दिली.  तेंव्हा पंचनामे करण्यासाठी तालुक्यात तलाठी कमी आहेत अशी तक्रार समोर आली . त्यावेळी त्यांनी तलाठ्यांची सर्व पदे भरली जाणार आहेत, असे आश्वासन दिले .  
 
 अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहता नये, असे आदेश आज आमदार वैभव नाईक यांनी तहसिलदार व कृषी विभागाला दिले. वारस तपास मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आमदार नाईक पुढे म्हणाले, "अवकाळी पावसामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तुम्ही शेतावर जाऊन तात्काळ पंचनामे करा. कोणीही शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये. आम्ही जास्तीत जास्त निधी देऊ. तुम्ही नुकसान काय झाले ते जाग्यावर जाऊन पहा. या पावसात ज्याच्या घरात पाणी गेले त्यांनाही भरपाई मिळाली पाहिजे. याबाबत संबंधित विभागाने परिपूर्ण आढावा पाठवा."

 यावेळी तहसीलदार व्ही. आर. नाचोलकर, अतुल बंगे, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सचिन काळप, राजन नाईक, स्नेहा दळवी, रमाकांत ताम्हाणेकर, नायब तहसिलदार दर्शना चव्हाण, नागेश आईर, कान्हू शेळके, अनुप नाईक, गंगाराम सडवेलकर, बबन बोभाटे, जयभारत पालव, मिलिंद परब, सुशील चिंदरकर, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, निलेश उगवेकर, राजन नाईक, अनुप्रीती खोचरे, मथुरा राऊळ, राजू गवंडे, विष्णू धुरी, महेंद्र वेंगुर्लेकर, राजू कविटकर, स्वाती तेंडोलकर, संदीप राऊळ, अनिल खोचरे, बाळू पालव, कृष्णा धुरी, बाळा पावसकर आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com