Vaibhav Naik asks Narayan Rane tough question | Sarkarnama

राणे माझ्याविरुद्ध का लढले नाहीत? : वैभव नाईक 

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

..

कुडाळ :  नारायण राणेंनी स्वतः या मतदारसंघातून माझ्यासमोर लढले पाहिजे होते. त्यांना येथील मतदार स्वीकारणार नाहीत, हे माहिती असल्यामुळेच ते निवडणुकीपासून दूर गेले, असा दावा आमदार वैभव नाईक यांनी येथील सरपंच लोकप्रतिनिधी मेळाव्यात आज केला.

श्री. नाईक म्हणाले, "मी सातत्याने मतदार व शिवसैनिकांच्या संपर्कात राहिल्यामुळेच लोकप्रतिनिधी झालो. मी कोणावरही टीका करणार नाही. मतदारसंघात सर्व कामे पूर्ण केली म्हणून लोक पुन्हा निवडून देतील. मी पाच वर्षांत सर्व बचत गटांना सक्षम केले. शेतीविषयक सर्वात जास्त 1000 पॉवरटिलर दिले. साडेतीन हजार स्ट्रीटलाईट दिली. सर्व शाळा डिजिटल केल्या. 25/15 चा सर्वात जास्त निधी मतदारसंघात दिला. यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन घेणार आहे. आचारसंहिता संपली की भात खरेदी सुरू होईल. भविष्यात जिल्हा परिषद शिवसेनेची असेल.''

"कुडाळमध्ये सुसज्ज क्रीडांगण, बसस्थानक, मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह, महिला रुग्णालय उभारणीबरोबरच महत्त्वाचे पूल, साकव, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आज सुस्थितीत करण्यात येत आहेत. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल केल्या जात आहेत. सर्व शाळांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही विकासाची गंगा यापुढेही सुरू ठेवणार," असल्याचे ते म्हणाले. 

Image result for deepak kesarkar facebook

जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास हा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले. 

तालुका सरपंच सेनेच्या वतीने शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार नाईक यांच्या प्रचारार्थ तालुक्‍यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा लोकप्रतिनिधी मेळावा आज महालक्ष्मी हॉल येथे आयोजित केला होता.

यावेळी जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, महिला संपर्कप्रमुख सुचिता चिंदरकर, जान्हवी सावंत, जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, अमरसेन सावंत, अतुल बंगे, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, निरीक्षक अनंत भोसले, सचिन काळप, राजू गवंडे, आमडोस सरपंच दिलीप परब, राजन नाईक, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, पावशी उपसरपंच दीपक आंगणे, संजय भोगटे, अतुल बंगे, ऍड. अनघा तेंडुलकर, सौ. अनुप्रीती खोचरे, राजेश कविटकर, मथुरा राऊळ, अनंत पाटकर, स्वाती तेंडोलकर, सचिन कदम, सरपंच, सदस्य उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख