होम क्वारंटाईनचे शिक्के मारून वाधवान कुटुंब महाबळेश्वरातील `दिवाण व्हिला`त मुक्कामी

जिल्हा प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी केली तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असे शिक्के मारले. त्यानंतर बेलएअर हॉस्पिटलच्या दोन बसमधून चोख पोलिस बंदोबस्तात महाबळेश्वरातील दिवाण व्हिलाया वाधवान यांच्या निवासस्थानी मुक्कामी रवाना केले.
corona satara
corona satara

भिलार (ता. महाबळेश्वर)  : येस बँक घोळाप्रकरणातील प्रमुख आरोपी व उद्योगपती वाधवान बंधुंना ताब्यात घेण्यासाठी आज सकाळी ईडीचे पथक पाचगणीत दाखल झाले. पण जिल्हा प्रशासनाने वाधवान कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर होम कोरंटाईनचे शिक्के मारून महाबळेश्वरातील दिवाण व्हिला या बंगल्याकडे नेण्यात आले. त्यांना १४ दिवसांच्या होम कोरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, काल (बुधवारी) सीबीआयच्या न्यायालयाने वाधवान कुटुंबियांना पाच मेपर्यंत महाबळेश्वर सोडू नये असे आदेश दिले आहेत. पण जिल्हा प्रशासनाने वाधवानचा मुक्काम आणखी १४ दिवस महाबळेश्वरातच ठेवला आहे. 

येस बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी व प्रसिध्द उदयोगपती वाधवान बंधु हे आपल्या कुटूंबासह २० मार्च रोजी मुंबईहुन लोणावळयाजवळील तुंगार्ली येथील पिकॉकव्हॅली सोसायटी मधील बंगल्यात राहण्यासाठी आले. प्रारंभी त्यांनी सहा दिवसांसाठी हे दोन बंगले बुक केले होते. परंतु त्याचवेळी देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने वाधवान कुंटूब हे लोणावळयातच अडकले होते.

त्यांनी काही दिवसांचे आरक्षण वाढविले परंतु बंगले खाली करण्यासाठी बंगले धारकाने तगादा लावल्याने आठ मार्च रोजी वाधवान बंधु यांनी लोणावळा सोडुन महाबळेश्वर येथील आपल्या दिवान विला या बंगल्यात येण्याचा निर्णय घेतला. येताना वाधवान बंधु यांनी गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे  पत्र घेतले. या पत्रामुळे वाधवान बंधु यांचा लोणावळा ते महाबळेश्वर हा प्रवास सुकर झाला असला तरी वाधवान बंधु यांना प्रवासासाठी पत्र देणे हे गुप्ता यांच्या चांगलेच अंगलट आले. गुप्ता यांना राज्य शासनाने तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

येस बॅंक आर्थिक घोटाळयातील आरोपी वाधवान बंधु हे जिल्हाबंदी ओदश झुगारून महाबळेश्वर येथे आल्याचे प्रशासनाला समजताच प्रशासनाने त्यांची चौकशी केली. वाधवान यांच्यासह एकुन २३ जणांची वैदयकिय तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासणीत कोणीही कोरोना पॉझिटीव्ह आढळुन आला नाही. तरीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाधवान यांचे बरोबर आलेले २३ जणांना नऊ एप्रिलपासुन पांचगणी येथे इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन केले.

त्याची मुदत २२ एप्रिलला काल संपल्यानंतर आज दुसऱ्या (गुरूवारी) दिवशी दुपारी जिल्हा प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी केली तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असे शिक्के मारले. त्यानंतर बेलएअर हॉस्पिटलच्या दोन बसमधून चोख पोलिस बंदोबस्तात महाबळेश्वरातील दिवाण व्हिला या वाधवान यांच्या निवासस्थानी मुक्कामी रवाना केले. या बंगल्यात ते पुढील १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. दरम्यान, मुंबईहून आलेले ईडीचे पथक वाधवान बंधूंना ताब्यात घेणार होते. मात्र, वाधवान बंधू ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाताला लागले नाहीत. त्याऐवजी जिल्हा प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाईनमध्ये पाठविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com