वडगाव शेरी हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि राहील : मुळीक

वडगाव शेरी हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि राहील : मुळीक

वडगाव शेरी : ""वडगाव शेरीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विकासासाठी केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधीची विकासकामे केली आहेत. त्यामुळे माझी जनतेशी नाळ जुळली आहे. नागरिकांचा कौल भाजपच्या बाजूने असल्याने माझा विजय निश्‍चित आहे,'' असा विश्वास आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. त्यामुळे वडगाव शेरी या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्लाच राहील, असा दावा त्यांनी केला.

वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपचे महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी गुरुवारी शिवसेना, रिपाइं, रासप महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले व खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.


मुळीक म्हणाले की, वडगाव शेरी मतदारसंघामध्ये पाच वर्षांमध्ये विकासकामे केली आहेत. वनाझ ते रामवाडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. वाघोलीपर्यंत मेट्रोचा प्रस्ताव सादर केला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाण पूल आणि नदीपात्रावरील पुलाचे नियोजन केले. भामा आसखेड योजनेचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण केले आहे.

मुळीक म्हणाले की, वडगाव शेरीची टॅंकरमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. डॉ. आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे निर्माण, एमएनजीएलद्वारे हजारो घरांमध्ये पाइपद्वारे गॅस पुरविला जात आहे. हरित वडगाव शेरीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, विश्रांतवाडीतील पाम उद्यान, खराडीतील बालोद्यान, वडगाव शिंदे येथे वन पर्यटन केंद्र उभारले जात आहे. तारकेश्वर देवस्थानला "क' दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित केले. लोहगाव येथील हरीण तळाच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.

ते म्हणाले की, मतदारांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेकडो ओपन जीम तयार केल्या आहे. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये डायलेसिस आणि डायग्नोस्टिक केंद्र आणि लोहगाव येथे शंभर खाटांचे रुग्णालय होणार आहे. अकरा गावांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली. लोहगाव, वडगाव शिंदे, निरगुडी, मांजरी येथे अकरा कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा न देता मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणला. मतदारसंघाचा विकास करणे हा अजेंडा डोळ्यांसमोर ठेवून मी प्रामाणिक काम केले आहे. यामुळे सर्व समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com