वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर...या नेत्याने केली मध्यस्थी

...
vijay vadettivar
vijay vadettivar

मुंबई : काॅंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली असून ते आज मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थीन करून त्यांची नाराजी दूर केल्याचे सांगण्यात आले.

भूकंप पुनर्वसन असे किरकोळ खाते मिळाल्याने वडेट्टीवार नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली नव्हती. बाळासाहेब थोरात दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांड यांच्याशी वड्डेट्टीवार यांच फोनवर  बोलणं करून दिले. त्यानंतर वड्डेट्टीवार यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेकडे असलेलं मदत व पुनर्वसन खात वड्डेट्टीवार यांना आता मिळणार आहे.

वडेट्टीवार हे आधीच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. विदर्भात काॅंग्रेसला त्यांच्या नेतृत्त्वाची चांगली मदत झाली होती. तरी पक्षाने किरकोळ खाते देऊन त्यांची बोळवण केल्याची त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाकडे पाठ फिरवून आऊट आॅफ रेंज गेले होते. अखेरीस या नाट्यावर पडदा पडला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com