कॉंंग्रेसच्या छाननी समितीतून डावलल्याने वडेट्टीवार नाराज

vijay vadettivar
vijay vadettivar

नागपूर : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षततेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी छाननी समिती स्थापन करण्यात आली. विरोधी पक्षनेते असलेल्या आमदार विजय वडेट्टीवारांना मात्र यात स्थान मिळाले नाही.

सहा सदस्यांच्या कमिटीमधून त्यांना डावलले. यासंदर्भात श्री वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता पहील्यांदाच असे घडले असल्याचे "सरकारनामा'ला सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

सोनिया गांधींनी निवडलेल्या कमिटीमध्ये ज्योतीरादित्य शिंदे, सदस्य हरीष चौधरी, मानीकम टागोर, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव मल्लीकार्जुन खर्गे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार के. सी. पडवी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी ही समिती तयार करण्यात आली आहे. पण यामध्ये महाराष्ट्राबाहेरच्याच लोकांचा भरणा असल्याचेही श्री. वडेट्टीवार म्हणाले. आज सकाळीच ते दिल्लीहून नागपुरला आले आणि लगेच त्यांच्या ब्रम्हपुरी या मतदारसंघात निघून गेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com