वाड्यात आरक्षण सोडतीवरून वाद; रणधुमाळी सुरू 

वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीवरून वाद निर्माण झाला आहे.
वाड्यात आरक्षण सोडतीवरून वाद; रणधुमाळी सुरू 

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीवरून वाद निर्माण झाला आहे. 

हे पद अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या पदासाठी 2 नोव्हेंबरला मंत्रालयातील नगरविकास विभागात सोडत झाली.

सोडतीनंतर लोकप्रतिनिधींना माहिती मिळाली. त्यामुळे ही सोडत अपारदर्शक वातावरणात झाली, असा आरोप बविआचे नेते अनंत सुर्वे यांनी केला आहे.

याबाबत भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला होता; परंतु त्याबाबत हे पक्ष फारसे उत्सुक नाहीत, असे एका राजकीय पक्षाच्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

वाडा नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे रणधुमाळी सुरू झाली आहे. 

वाडा नगरपंचायतीत एकूण 18 जागा असून 10 हजार 591 मतदार आहेत. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, बहुजन विकास आघाडी, शेकाप आदी पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवतील, असे बोलले जात आहे. 

भाजप आणि शिवसेना वगळता इतर पक्ष आघाडी करण्याची शक्‍यताही वर्तवली जाते. खरी लढत शिवसेना आणि भाजप यांच्यातच होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेल्या संकेतस्थळावर 18 ते 24 नोव्हेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्रे भरता येतील; मात्र रविवारी (ता. 19) नामनिर्देशनपत्र देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी 25 नोव्हेंबरला होईल. उमेदवारी अर्ज 30 नोव्हेंबरला मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबरला आणि मतमोजणी 14 डिसेंबरला होईल. तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com