शरद पवारांनी महिलांना आरक्षण देऊन सन्मान दिला- वर्षा निंबाळकर

''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांसाठी आरक्षण दिले, त्यांना आत्मसन्मान दिला. त्यामुळे शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या संजय निंबाळकर यांना संधी द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत,'' असे आवाहन करत निंबाळकर यांच्या पत्नी वर्षाताई निंबाळकर यांनी उस्मानाबाद शहरात डोअर- टू- डोअर प्रचार केला.
Usmanabad NCP Candidate Sanjay Nimabalkars Wife Campaigning for Husband
Usmanabad NCP Candidate Sanjay Nimabalkars Wife Campaigning for Husband

उस्मानाबाद :  ''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांसाठी आरक्षण दिले, त्यांना आत्मसन्मान दिला. त्यामुळे शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या संजय निंबाळकर यांना संधी द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत,'' असे आवाहन करत निंबाळकर यांच्या पत्नी वर्षाताई निंबाळकर यांनी उस्मानाबाद शहरात डोअर- टू- डोअर प्रचार केला.

विधानसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निंबाळकर यांच्या प्रचारासाठी महिलांना सोबत घेऊन वर्षा निंबाळकर यांनी प्रचार मोहीम राबविली आहे. यासाठी त्यांना महिलांची मोठी साथ मिळत आहे. उस्मानाबाद शहरातील प्रभागांमध्ये दररोज त्या प्रचारफेरी काढून मतदारांना आवाहन करीत आहेत. घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार सुरू आहे. प्रत्येक मतदारांशी संवाद साधत त्या संजय निंबाळकर यांच्या कार्याची माहिती महिलांना देत आहेत. 

महिला आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना सार्वजनिक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. महिलांना सन्मान मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष असल्याने त्यांच्या पाठिशी महिलांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. महिलांना उभारी देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. त्यामुळे मतदारांनी या पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन त्या मतदारांना करीत आहेत.

उमेदवार निंबाळकर हे अनुभवी आहेत. त्यांना विकासाची जाण आहे. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. उस्मानाबाद शहरासह मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर आणून येथील समस्यांची सोडवणूक करण्यात येईल. मतदारसंघातील स्थानिक समस्या सोडवून घेतानाच मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी महाआघाडीला मतदान करावे, असे आवाहन निंबाळकर प्रचारफेरी दरम्यान करीत आहेत. बुधवारी शहरातील शाहूनगर भागात जाऊन त्यांनी प्रचार केला. निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवसांपासून वर्षा निंबाळकर यांनी प्रभागनिहाय प्रचार सुरू केला. प्रत्येक घरांमध्ये जाऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे, उमेदवार निंबाळकर यांच्या कार्याची माहिती देत आहे. यामध्ये त्यांना महिलांचेही मोठे सहकार्य लाभत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com