usamanabad zp | Sarkarnama

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला धाकधूक, सदस्य सहलीवर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मार्च 2017

उस्मानाबाद ः जिल्हा परिषदेत सर्वाधिक म्हणजे 26 सदस्य निवडून आलेले असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसला दगाफटका होण्याची चिंता सतावत आहे. अध्यक्षपदासाठी केवळ दोन सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. सध्या असलेल्या संख्याबळाला धक्का लागू नये याची काळजी राष्ट्रवादीचे नेते घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व 26 सदस्यांना 21 मार्चपर्यंत एका अज्ञातस्थळी सहलीवर रवाना करण्यात आले आहे. आता हे सर्व सदस्य थेट मतदानाच्या दिवशीच हजर होणार आहेत. 

कॉंग्रेस-शिवसेनेच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद आपल्याकडे खेचून घेण्यात राष्ट्रवादीला पहिल्यांदाच यश आले आहे. 55 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत मिळाले आहे. बहुमतासाठी 28 सदस्यांची आवश्‍यकता असतांना राष्ट्रवादीकडे 26 संख्याबळ आहे. कॉंग्रेस आणि शिवसेना मिळून त्यांचा आकडा 24 एवढा होतो. त्यामुळे सत्तेसाठी राष्ट्रवादीला 2 तर कॉंग्रेस-शिवसेनेला चार सदस्यांची गरज आहे. जी भाजपकडून पूर्ण होऊ शकते.

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी आणि भाजप सोबत असल्याने त्यांनी आम्हालाच पाठिंबा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने भाजप नेत्यांकडे केली आहे. हे चार सदस्य आपल्या गळाला लागावेत यासाठी कॉंग्रेस-शिवसेनेने देखील कंबर कसली आहे. भाजपने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट न करता दोन्ही पक्षांना गॅसवर ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 21 मार्चला असल्याने राष्ट्रवादीने सर्व खबरदारी घेत आपल्या सदस्यांना सोमवारीच पश्‍चिम महाराष्ट्रातील एका शहरात पाठवून दिले आहे. या सदस्यांवर वॉच ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या विश्‍वासातील एक पदाधिकारी देखील या सदस्यांसोबत पाठवल्याचे कळते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख