ऊर्मिला मातोंडकरांचा लेटर बॉम्ब!

लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या `लेटर बॉम्ब'मुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
ऊर्मिला मातोंडकरांचा लेटर बॉम्ब!

पुणे - लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या `लेटर बॉम्ब'मुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 

मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे विश्वासू सहकारी संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्याविरुद्ध ऊर्मिला मातोंडकरांनी तत्कालीन मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. 

मातोंडकरांनी हे पत्र निवडणूक निकाल लागण्यापूर्वी आठवडाभर म्हणजे 16 मे रोजी लिहिले आहे. 

पत्रात म्हटले आहे, की वरील दोन नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ नियोजन होते. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एप्रिलमध्ये बोरिवलीमध्ये झालेल्या संयुक्त सभेचे आयोजनही ढिसाळ केले होते. 

`कोंडविलकर यांनी आपल्या कुटुंबियांकडे फोन करून निवडणूकीसाठी पैसे मागितले. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेसचे खजिनदार अहमद पटेल यांच्याशी पैशाबाबत बोलण्यास सांगितले. उत्तर मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक सुतराळे यांच्याशी अपमानास्पदरित्या दोघे वागले,'' असेही मातोंडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

कोंडविलकर आणि पाटील यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करतानाच संघटनात्मक पातळीवर बदल करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. पक्षाच्या भल्यासाठीच आपण हे पत्र लिहित आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com