urmila matondkar resign congress party | Sarkarnama

उर्मिला मातोंडकर यांचा कॉंग्रेसला रामराम

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे : अल्पावधीत कॉंग्रेसचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे पक्षात मन काही रमले नाही. निवडणुकीनंतर शंभर दिवसही होत नाहीत तोवर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनाम देऊन पक्षाला कायमचा रामराम ठोकला आहे. 

पुणे : अल्पावधीत कॉंग्रेसचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे पक्षात मन काही रमले नाही. निवडणुकीनंतर शंभर दिवसही होत नाहीत तोवर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनाम देऊन पक्षाला कायमचा रामराम ठोकला आहे. 

तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मातोंडकर यांनी कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यांनी उत्तर मुंबईतून भाजपचे बडे नेते गोपाळ शेट्टींविरोधात निवडणूकही लढविली होती. प्रचारात त्यांनी चांगली हवाही निर्माण केली होती. मात्र निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कॉंग्रेसच्या पराभवानंतर मुंबई कॉंग्रेसमधील वादही उफाळून आला होता. 

मातोंडकर यांनी पक्षातील काही मंडळींविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली होती व तसे पत्रही पाठविले होते. मात्र या पत्राची दखल म्हणावी तशी घेण्यात आली नाही. यामुळे नाराज झालेल्या मातोंडकर यांनी शेवटी पक्ष सोडण्याच निर्णय घेतला.

त्यांनी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर त्या म्हणाल्या, की यापुढे सामाजिक कार्यात सक्रिय राहाणार आहे. मात्र मी यापुढे कॉंग्रेसमध्ये नसेल. कॉंग्रेसमध्ये सहा महिनेही त्यांचा टिकाव लागला नाही याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख