urli kanchan sarpanch dispute | Sarkarnama

उरळी कांचन सरपंचपदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात 

जनार्दन दांडगे 
शनिवार, 15 डिसेंबर 2018

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात 15 ग्रामपंचायत सदस्यांनी 15 सष्टेंबर रोजी मंजूर केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाने 4 जानेवारी ही तारीख सुनावणीस ठेवली आहे. 

सर्वोच्च न्यायालयातील या याचिकेने ग्रामपंचायतीचा अविश्वास ठरावाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात पोहचल्याने या निर्णयाचा निर्वाळा अंतिम न्यायव्यवस्था करणार आहे. 

सरपंच कांचन यांच्यावर 15 सप्टेंबर रोजी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर जिल्हाधिकारी राम नवल यांनी नवीन सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीचा मार्ग खुला झाला होता. अश्विनी कांचन यांच्याविरोधात मागील चार महिन्याच्या कालावधीत तब्बल दोन वेळा मोठ्या मताधिक्‍याने अविश्वास ठराव झाले होते.

पहिल्या अविश्वास ठरावाची नोटीस वेळेत नसल्याचा दावा करीत कांचन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितली होती. तसेच दुसऱ्या वेळेस अविश्वास ठराव आणण्यात आला. तोही मंजूर करण्यात आला होता. पहिल्या वेळेचे कारण पुढे करीत मागितलेली दाद जिल्हाधिकारी कार्यालयाने फेटाळून लावली होती. 

कांचन यांच्याविरोधात 15 ग्रामपंचायत सदस्यांनी 15 विरुद्ध 1 मताने मंजूर केलेला ठराव जिल्हाधिकारी, पुणे यांनी अपिलात वैध असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात अपिल झाल्यानंतर न्यायालयाने 6 सष्टेंबर रोजी महत्वपूर्ण निर्णयात जिल्हाधिकारी , पुणे यांचा निर्णय कायम ठेवला आहे.

या निर्णयावर अपिलातील मुदतीत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाला शुक्रवारी (ता. 14 ) थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने निकालाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा पडताळणीवर राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या 6सष्टेंबर रोजीच्या निर्णयाची कायदेशीर बाबी सर्वोच्च न्यायालयापुढे उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने या याचिकेवर निर्णयाची बाजू मांडण्यासाठी मुदत देऊन 4 जानेवारी रोजी सुणावणी निश्‍चित केली आहे. न्यायालयाने सुणावणीची तारीख निश्‍चित करून न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणुक प्रक्रिया प्रलंबित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख