urja kolhapur | Sarkarnama

जे जमत नाही, ते पहिल्यांदा स्वतः "ट्राय' करा...! 

सरकारनामा न्यूजब्युरो 
शनिवार, 4 मार्च 2017

 "ऍड फिल्म्स आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीतही संघर्ष करीत यशाचे अनेक टप्पे पार केले... "व्हेंटिलेटर'ची कथा सुचताच ती लिहूनही काढली... लेखन
आपलं काम नाही, म्हणून मग तीच कथा पटकथा आणि संवादासाठी दुसऱ्या लेखकांकडे दिली; पण ती मनासारखी होत नव्हती. अखेर जे जमत नाही, ते स्वतःच
ट्राय केलं तर काय हरकत आहे, असा प्रश्‍न स्वतःच्या मनाला विचारला आणि पटकथा-संवादही मीच लिहिले... "व्हेंटिलेटर' यशस्वी झाला आणि आता इथून पुढे जे
काही चित्रपट करेन ते मीच लिहीन, असा संकल्प केला आहे...'' बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक राजेश मापूसकर संवाद साधत होते आणि फिल्म
इंडस्ट्रीतील विविध अनुभवांची शिदोरी उलगडताना तरुणाईसाठी विविध टीप्सही मिळत होत्या. 

कोल्हापूर : "ऍड फिल्म्स आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीतही संघर्ष करीत यशाचे अनेक टप्पे पार केले... "व्हेंटिलेटर'ची कथा सुचताच ती लिहूनही काढली... लेखन
आपलं काम नाही, म्हणून मग तीच कथा पटकथा आणि संवादासाठी दुसऱ्या लेखकांकडे दिली; पण ती मनासारखी होत नव्हती. अखेर जे जमत नाही, ते स्वतःच
ट्राय केलं तर काय हरकत आहे, असा प्रश्‍न स्वतःच्या मनाला विचारला आणि पटकथा-संवादही मीच लिहिले... "व्हेंटिलेटर' यशस्वी झाला आणि आता इथून पुढे जे
काही चित्रपट करेन ते मीच लिहीन, असा संकल्प केला आहे...'' बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक राजेश मापूसकर संवाद साधत होते आणि फिल्म
इंडस्ट्रीतील विविध अनुभवांची शिदोरी उलगडताना तरुणाईसाठी विविध टीप्सही मिळत होत्या. 

सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत "ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत आज पाचवे पुष्प त्यांनी गुंफले.
योगेश देशपांडे (पुणे) यांनी हा संवाद खुलवला. 

"नमस्कार कोल्हापूरकर' अशी साद घालतच मापूसकर यांनी संवादाला प्रारंभ केला. त्यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन. साहजिकच त्यांचे सारे बालपण
समुद्रकिनारी सरले. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईतील एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. "सीए' व्हावं, अशी वडिलांची
अपेक्षा म्हणून कॉमर्सला प्रवेश घेतला. इंग्रजी भाषेबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतानाही पदवीपर्यंतची पाच वर्षे कशीबशी रडतखडत काढली आणि 36 टक्‍क्‍यांनी ते
"बीकॉम' झाले. इथपर्यंतचा सारा प्रवास उलगडताना त्यांनी सिनेमा थिएटर चालवण्यासह गावाकडच्या विविध आठवणी, भेटलेली गर्लफ्रेंड, तिच्याकडून मिळालेली
मोटिव्हेशन आणि इतर रंजक किस्सेही शेअर केले. 

मुंबईत स्ट्रगल करत असतानाच एका ऍड फिल्मच्या निमित्ताने राजकुमार हिराणी यांच्याबरोबर मैत्री जमली आणि नंतर त्यांच्याबरोबरीनेच अनेक चित्रपट हिट केले.
"मुन्नाभाई एमबीबीएस'चा प्रवास व्हाया शॉर्टफिल्म, टीव्ही मालिका असा राहिला. या दोन्ही गोष्टी शक्‍य न झाल्याने चित्रपट तयार झाला आणि तो लोकप्रिय झाला.
"मुन्नाभाई'ची भूमिका सुरवातीला विवेक ओबेरॉय करणार होता. त्याला शक्‍य नसल्याने शाहरूखने भूमिका स्वीकारली; पण अखेर त्यालाही न जमल्याने अखेर ती
संजय दत्त यांच्याकडे गेली, अशा अनेक आठवणीही त्यांनी सांगितल्या. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख