मळलेल्या वाटा सोडा; स्वयंप्रकाशित उद्योजक बना...!  - urja kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

मळलेल्या वाटा सोडा; स्वयंप्रकाशित उद्योजक बना...! 

सरकारनामा न्यूजब्युरो 
शुक्रवार, 3 मार्च 2017

डॉक्‍टर, इंजिनिअर आता बस्स झाले...मळलेल्या अशा पारंपरिक वाटा सोडा...नावीन्यपूर्ण कल्पना आणि त्यांना व्यावसायिक चातुर्याची जोड देत
रोजगारनिर्मिती करणारे स्वयंप्रकाशित उद्योजक बना...असा मौलिक मंत्र आज प्रसिद्ध उद्योजक आणि मिडास संस्थेचे संस्थापक पराग शहा यांनी दिला. 

कोल्हापूर : डॉक्‍टर, इंजिनिअर आता बस्स झाले...मळलेल्या अशा पारंपरिक वाटा सोडा...नावीन्यपूर्ण कल्पना आणि त्यांना व्यावसायिक चातुर्याची जोड देत
रोजगारनिर्मिती करणारे स्वयंप्रकाशित उद्योजक बना...असा मौलिक मंत्र आज प्रसिद्ध उद्योजक आणि मिडास संस्थेचे संस्थापक पराग शहा यांनी दिला. 

सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत "ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत चौथे पुष्प त्यांनी गुंफले. शिवाजी
विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या दिलखुलास संवादात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली. 
दरम्यान, वेगळे काही तरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना उद्योजकता विकासाचे उत्तम प्रशिक्षण "मिडास'च्या माध्यमातून दिले जाणार असून माझ्या हयातीत किमान
दहा हजार उद्योजक घडवणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या एका उद्योजकाने किमान पाचशे जणांना रोजगार उपलब्ध करून दिला, तरी तब्बल दोन कोटींहून अधिक
भारतीयांच्या हातांना काम मिळेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. मिलिंद कुलकर्णी (पुणे) यांनी हा संवाद अधिक खुलवला. 

श्री. शहा दौंडसारख्या छोट्या खेड्यातून पुण्यात येऊन यशोलौकिकाचे शिलेदार ठरलेले व्यक्तिमत्त्व. दौंडमध्येच पाचवीपर्यंत शिक्षण झाले आणि त्यानंतर पुण्यात
बोर्डिंगला रवानगी झाली. करमत नाही म्हणून खिशात केवळ वीस पैसे असताना बोर्डिंगमधून ते पळूनही आले; पण आईने समजूत काढून पुन्हा बोर्डिंगला सोडले, ही
आठवण सांगताना त्या वेळी तीन आणि सहा यामधील फरकही कळत नव्हता, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. ते म्हणाले, ""पुढे दहावी पास झालो आणि विज्ञान
शाखेला प्रवेश घेतला. त्याचदरम्यान प्रेम जमले आणि सकाळी मॅटिनी शो, दिवसभर दंगामस्ती हे सारे सुरू झाले आणि बारावीत नापास झालो. आईने त्यावेळी
दिलेली थप्पड अजूनही लक्षात आहे. घरात डॉक्‍टर, सीए, प्रोफेसर्स यांची परंपरा असताना तू नापास होऊच कसा शकतोस, हा आईचा प्रश्‍न होता. मात्र, त्याच वेळी
मला डॉक्‍टर व्हायचे नाही, असे स्पष्ट सांगून पुन्हा कॉमर्समधून बारावीची परीक्षा दिली. उत्तीर्ण झालो आणि त्यानंतर एमबीए पूर्ण केले.'' 

पदवीनंतर त्यांनी पुण्यात पहिला व्यवसाय सुरू केला तो फोटोग्राफी आणि लॅबचा. त्याबाबतची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. ते म्हणाले, ""फोटो लॅब सुरू केली;
पण, ऑर्डर कशा मिळवायच्या हा प्रश्‍न होता. बुधवार पेठेतील बाबूभाईंकडे गेलो आणि त्यांनी वेळ नाही म्हणून सांगितले; मात्र त्यानंतर सलग पंधरा दिवस
त्यांच्याकडे जाऊन काम मागायचो. अखेर त्यांनी सुरवातीला दोन फिल्म डेव्हलपिंगसाठी दिल्या. त्या डेव्हलप करून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी त्या
फेकून दिल्या. त्यांना पुन्हा विनंती करून एक सॅम्पल प्रिंट मागून घेतली आणि पुन्हा त्या दोन प्रिंट तयार करून दिल्यानंतर त्यांचा विश्‍वास संपादन करू शकलो.
बाबूभाई हे माझे पहिले ग्राहक. त्यामुळे त्यांच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत त्यांचा विश्‍वास कधीही ढळू दिला नाही. लॅबच्या व्यवसाय अकरा हजार, त्यानंतर एक कोटीची
उलाढाल, दिवसाला एक लाख प्रिंट असा विस्तारला. बाबूभाईंचे काम बंद झाले; पण आम्ही सतत भेटत होते. अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला; मात्र, मृत्युपश्‍चात
त्यांनी माझ्यासाठी एक सोन्याची वीट देण्याबाबत मृत्युपत्रात लिहून ठेवले होते. त्या विटेचे अडीच लाख आणि त्यात माझ्याकडील अडीच लाख अशी रक्कम ठेव
ठेवून त्यातून प्रत्येक वर्षी पन्नास विद्यार्थ्यांनी आम्ही शिष्यवृत्ती सुरू केली.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख