Urali Kanchan Sarpanch Ashwini Kanchan removed from post by no-confidence motion | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

 उरुळी कांचनच्या सरपंच अश्विनी कांचन यांच्याविरुद्ध  तीन महिन्यात  दुसऱ्यांदा अविश्वास ठराव मंजूर 

जनार्दन दांडगे
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

यावेळी तरी अश्विनी कांचन विरोधकांना यश मिळणार का?  की कांचन यांना सरपंचपदावरुन पायउतार व्हावे  लागणार ? या  प्रश्नाकडे उरुळी कांचन ग्रामस्थांच्या बरोबरच संपुर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागुन राहिले आहे. 

उरुळी कांचन   : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्यावर तीन महिन्याच्या आत दुसऱ्यांदा मोठ्या मतांच्या फरकाने अविश्वास ठराव मंजुर झाला.

ग्रामपंचायत सदस्य संतोष हरीभाऊ कांचन व जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्यासह पंधरा ग्रामपंचायत सदस्यांनी दुसऱ्यांदा दाखल केलेला अविश्वास ठराव शनिवारी (ता. 15) पंधरा विरुध्द एक असा एकतर्फी फरकाने मंजुर करुन, कांचन यांना जोरदार राजकीय दणका दिला. मागील  अविश्वास ठरावाप्रमाणे याहीवेळी अश्विनी कांचन यांनी अविश्वास ठरावाच्या कामकाजात अनुपस्थित राहणे पसंत केले.

तर दुसरीकडे तीन महिन्यांपूर्वीच्या अविश्वास  ठरावाप्रमाणे याही वेळेस तलाठी कार्यालयाकडून अविश्वास ठरावाच्या बैठकीची नोटीस वेळेवर मिळालेली नाही असा अश्विनी कांचन यांचा दावा आहे .

तसेच ग्रामपंचायतीच्या  विद्यमान पाच ग्रामपंचायत सदस्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्रे दाखल केले नसल्याने  ते सदस्य पदावर  राहण्यास अपात्र आहेत असे अश्विनी कांचन यांचे म्हणणे आहे .

त्यामुळे त्यांना सदस्य पदावरून दूर करावे अशी मागणी त्या पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे कारणा आहेत . अशा अपात्र सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव कसा वैध ठरतो ? असा त्यांचा सवाल आहे . 

या सर्व मुद्यांच्या आधारे   यावेळेसच्याही  अविश्वास  ठरावाला जिल्हाधिकारी कार्यालयात आव्हाऩ देण्याचा निर्धार  सरपंच अश्विनी कांचन यांनी केली आहे. यामुळे यावेळी तरी कांचन विरोधकांना यश मिळणार का?  की कांचन यांना सरपंचपदावरुन पायउतार व्हावे  लागणार ? या  प्रश्नाकडे उरुळी कांचन ग्रामस्थांच्या बरोबरच संपुर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागुन राहिले आहे. 

सतरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या उरुळी कांचन ग्रामपंतीच्या सरपंच अश्विनी कांचन यांच्याविरुध्द तीन महिन्यांपूर्वी मंजुर झालेला अविश्वास ठरावाची नोटीस  वेळेत मिळाली नाही असा दावा  अश्विनी कांचन यांनी केला होता . त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या मुद्य्यांवर अपील केले होते .  श्रीमती कांचन यांचे म्हणजे ग्राह्य धरीत करीत, जिल्हाधिकारी राम नवल कदम यांनी अविश्वास ठराव रद्द करण्याचे आदेश दहा दिवसापूर्वी दिले होते.  

त्यानंतर पंधरा सदस्यांनी तात्काळ कांचन यांच्या विरोधात नव्याने अविश्वास  ठराव दाखल केला होता. या नव्याने दाखल झालेल्या ठरावावर हवेलीचे तहसिलदार प्रशांत पिसाळ व उरुळी कांचनचे सर्कल दिपक चव्हाण यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यात कांचन यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या बाजुने पंधरा तर विरोधात एक मत पडले. यावर पिसाळ यांनी कांचन यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजुर झाल्याची घोषणा  केली. दरम्यान याही वेळेस अश्विनी कांचन गैरहजर होत्या. 

उरुळी कांचनचे बेभरवशाचे राजकारण

चिनमध्ये उत्पादीत झालेल्या चिनी वस्तुंच्या बाबतीत 'चले तो चांद तक नही तो रात तक' असे गमंतीने बोलले जाते. उरुळी कांचनचे राजकारण ही चिनी वस्तुप्रमाणे बेभरवशाचे बनल्याची चर्चा उरुळी कांचन ग्रामस्थात चालु आहे. 

सतरा सदस्याच्यापैकी बहुसंख्य सदस्य आपआपल्या हिमतीवर वेगवेगळ्या आघाड्या करुन सदस्य म्हणून  ग्रामपंचायतीत निवडुन आले. पदासाठी विकास या शब्दाची ढाल करुन, कांही सदस्यांनी एकत्र येत कांचन यांना सरपंचपदावर बसविले.

मात्र ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने, सरपंच बनविणाऱ्या कांही सदस्यांनी विरोधी सदस्यांच्या मदतीने कांचन यांच्यावर अविश्वाश ठराव मंजुर करवुन घेतला. मात्र विरोधकांची ही एकी किती काळ नव्हे तर किती दिवस टिकेल ? याबद्दल उरुळी कांचन ग्रामस्थांत शंकेचे वातावरण आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख