लोकसभेला हवेसे भाऊ, दादा विधानसभेला का नकोसे झाले?

५ वर्षे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये दादा,भाऊंनी २०१७ ला ‘कमळ’ फुलवले. त्यावेळच्या या ‘राम-लक्ष्मण’च्या जोडीला आता पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागते आहे. निष्ठावंतांना संधी मिळाली पाहिजे,असा सूर शहरातील काही पदाधिकारी आणि जुन्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरला आहे. त्यासाठी चिंचवड, भोसरीसह पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांच्या नावाची चर्चा हेतुपुरस्सर घडवून आणली जात आहे.
Mahesh Landge - Laxman Jagtap
Mahesh Landge - Laxman Jagtap

लोकसभा निवडणुकीला उमेदवार म्हणून भाजपला हवेहवेसे वाटणारे भाऊ आणि दादा (चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे) चार महिन्यांतच विधानसभेला पक्षातील निष्ठावंताना नकोसे झाले आहेत. उमेदवारी मिळावी म्हणून निष्ठावंतांनी सुरु केलेल्या जोरदार मोर्चेबांधणीने या 'नकोसे'च्या चर्चेला मोठे बळ दिले आहे. 

५ वर्षे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये दादा,भाऊंनी २०१७ ला ‘कमळ’ फुलवले. त्यावेळच्या या ‘राम-लक्ष्मण’च्या जोडीला आता पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागते आहे. निष्ठावंतांना संधी मिळाली पाहिजे,असा सूर शहरातील काही पदाधिकारी आणि जुन्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लावून धरला आहे. त्यासाठी चिंचवड, भोसरीसह पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात निष्ठावंतांच्या नावाची चर्चा हेतुपुरस्सर घडवून आणली जात आहे. एवढेच नाही,तर जुन्या  निष्ठावंत विधानसभेला उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असा विश्वास काहीजण उघडपणे बोलून दाखवताना दिसत आहेत. 

चिंचवड  मतदारसंघात आमदार आणि जगताप हे शहर भाजपचे ‘बाहुबली’ म्हणून ओळखले जातात. तर भोसरीत आमदार लांडगे हे भाजपचे ‘हुकमी एक्का’ आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार जगताप आणि लांडगे यांना आता भाजपमध्येही त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.चिंचवडमध्ये जगताप यांना प्रतिस्पर्धी नाही, अशी चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून चिंचवडमधून लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे बोलले जाते. तेथील एका स्वीकृत नगरसेवकानेही निष्ठावंतांच्या उमेदवारीसाठी रान पेटवण्यास सुरवात केली आहे. तर, भोसरीमध्येही निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरु आहे. 

भाजप सत्तेत आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील निष्ठावंतांना पक्षाने भरभरुन दिले आहे. राज्यसभेवर खासदार अमर साबळे यांना संधी दिली. राज्य लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी सचिन पटवर्धन नियुक्त केले गेले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशीव खाडे, लोकशाहीर अण्णाभाउ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदावर अमित गोरखे यांना संधी देण्यात आली. महापालिकेत सत्तारुढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विलास मडिगेरी, स्वीकृत नगरसेवकपदी मोरेश्वर शेडगे, माउली थोरात, बाबू नायर यांना घेण्यात आले. तरीही आम्हाला संधी मिळाली नाही, अशी खंत व मागणी निष्ठावंताकडून केली जात आहे. 

त्यातूनच विधानसभेला निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी पुढे आली आहे.एवढेच नाही,तर,त्यासाठी गुप्तपणे जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.गृहकलहामुळे राष्ट्रवादीची शहरातील सत्ता गेली. तशीच काहीशी स्थिती आता भाजपमध्ये निर्माण होताना दिसते आहे. असे झाल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदार जगताप आणि लांडगे हे दोघेही मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी सज्ज आहेत, अशी वल्गना करणार-या भाजपच्या काही निष्ठावंत पदाधिका-यांना विधानसभा निवडणुकीत जगताप-लांडगे नकोसे का झाले? असा प्रश्न आता जगताप आणि लांडगे समर्थकांकधून विचारला जात आहे. 

उमेदवार पडला तरी चालेल पण जगताप, लांडगे नको? अशी त्यांची भावना तयार होण्यामागे देशातील मोदी लाट आणि भाजपच्या तिकीटावर कोणीही निवडून येवू शकतो, हे कारण असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे निष्ठावंत आणि जुने अशा बॅनरखाली विधानसभा इच्छुक असल्याचे ‘ब्रँडिंग’ केले जात आहे. मात्र, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे या चौकटीत एकही इच्छुक उमेदवार विजयाश्री खेचून आणण्याच्या ताकदीचा नाही, ही वस्तुस्थिती आहे.तरीही शहरात आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांचे वर्चस्व नको या भावनेतून काही इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. काहींनी तर उमेदवार पडला तरी चालेल पण निष्ठावंतांना संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. 

त्यासाठी निष्ठावंत आणि जुन्या भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी विचार मंच, तसेच नरेंद्र मोदी विचार मंच अशी काही व्यासपीठे तयार केली आहेत. त्याद्वारे भाजप पक्षश्रेष्ठींसमोर दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नवे-जुने, निष्ठावंत, निष्ठावंत नसलेले जगताप गट, लांडगे गट, साबळे गट असे अंतर्गत गटतट निर्माण झाले आहेत. अशीच परिस्थिती एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होती. पुढे राष्ट्रवादीचे बुरूज ढासळले, हे वास्तव आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिस्तप्रिय असलेल्या शहर भाजपची वाटचाल आता राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊन ठेऊन सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com