unrest in p n patil supporters | Sarkarnama

पक्षनिष्ठा पी. एन. पाटलांना मंत्रीपदापर्यंत नेऊ शकली नाही!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पुर्वी कै. विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असलेल्या पी. एन. यांची गांधी कुटुंबियांवर प्रचंड निष्ठा होती. या जोरावर मंत्रीपदासाठी त्यांनीही जोरदार प्रयत्न केले होते, पण त्यांना डावलल्याने त्यांची ही पक्षनिष्ठा निष्प्रभ ठरली.  

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पी. एन. पाटील असे जिल्ह्याचे समीकरण होते. सातत्याने त्यांची पक्षनिष्ठा अधोरेखित राहीली आहे, पण ही पक्षनिष्ठा त्यांना मंत्रीपदापर्यंत मात्र नेऊ शकली नाही. परिणामी त्यांच्या गोटातही अस्वस्थता आणि नाराजी आहे.

राष्ट्रवादीची स्थापना 1999 साली झाली, त्यानंतर कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष व्हायला कोण तयार नव्हते. अशा परिस्थितीत पी. एन. पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. सहा निवडणुकीतील चार निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण पक्ष बदलण्याचा विचार कधी त्यांना कधी शिवलाही नाही. तरीही त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह इतर सहकारी संस्थात कॉंग्रेसच्या सत्तेसाठी प्रयत्न केले.

2014 ला देशात मोदी लाट असताना अनेक दिग्गजांनी कॉंग्रेस पक्ष सोडला. अनेकांचा तसा विचार सुरू होता पण अशा अडचणीच्या काळातही पी. एन. पक्षासोबत राहीले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही करवीरमधून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. पुर्वी कै. विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक असलेल्या पी. एन. यांची गांधी कुटुंबियांवर प्रचंड निष्ठा होती. या जोरावर मंत्रीपदासाठी त्यांनीही जोरदार प्रयत्न केले होते, पण त्यांना डावलल्याने त्यांची ही पक्षनिष्ठा निष्प्रभ ठरली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख