भाजपच्या जागेवर आमदार शेळकेंनी बिनविरोध निवडून आणला...

...
भाजपच्या जागेवर आमदार शेळकेंनी बिनविरोध निवडून आणला...

तळेगाव दाभाडे :  तळेगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 1 "ब'च्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निखिल उल्हास भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानण्यात येत आहे. निवडीची औपचारिक घोषणा अर्ज माघारीनंतर होण्याची शक्‍यता आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात सर्वपक्षीय पाठिंब्यावर एकमताने निवड होण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल.

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संदीप शेळके यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता स्टेशन विभागातील बुद्धविहार व त्यानंतर ग्रामदैवत मारुती मंदिरात दर्शन घेऊन शक्तिप्रदर्शन करीत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भगत यांनी अर्ज दाखल केला.

या वेळी गणेश काकडे, गणेश खांडगे, सुशील सैंदाणे यांची भाषणे झाली. भाजपकडे सहा; तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडे दहा जणांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. संबंधितांच्या मुलाखतीही झाल्या होत्या, त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत कोणाचाही अर्ज दाखल होऊ शकला नाही.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी शहर विकासासाठी निवडणूक प्रक्रिया टाळावी,
व वातावरण हलके-फुलके राहावे, स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील सदस्याला काम करण्याची संधी मिळावी, या हेतूने सर्वपक्षीय बिनविरोध उमेदवार निवडीची संकल्पना मांडली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. समितीतील सहकारी गणेश खांडगे, बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, यादवेंद्र खळदे यांच्याबरोबर विचारविनिमय करून सहमती मिळविली व भगत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com