आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्याची परवानगी द्यावी: आठवले  

14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी होते. यंदा मात्र कोरोनाचा धोका असल्याने विषाणूचा नायनाट होईपर्यंत आंबेडकरी जनतेने संयम पाळावा.
union minister ramdas aathawale appeals about ambedkar jayanti
union minister ramdas aathawale appeals about ambedkar jayanti

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा घरीच साजरी करावी. तसेच घरावर अशोक चक्रांकित निळा झेंडा लावावा, असे आवाहन केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच जयंती दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ज्या ठिकाणी आहेत, तिथे पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी 5 जणांना द्यावी, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.

आठवले यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारी विरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीम जयंती घरी थांबूनच साजरी करूया. कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करूया. त्याआधी कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा, असे आठवले म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com