बेरोजगार अभियंत्यांना दीड कोटीपर्यंतची कामे :  पाटील - unemployed engineers will be given contracts up to 1.5 crore : Patil | Politics Marathi News - Sarkarnama

बेरोजगार अभियंत्यांना दीड कोटीपर्यंतची कामे :  पाटील

सरकारनामा
शुक्रवार, 13 जुलै 2018

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळावीत म्हणून त्यांची नोंदणी मर्यादा 50 लाखांवरून दीड कोटीपर्यंत वाढविली आहे.

- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर: राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळावीत म्हणून त्यांची नोंदणी मर्यादा 50 लाखांवरून दीड कोटीपर्यंत वाढविली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

यासंदर्भातील प्रश्‍न सतिश चव्हाण यांनी उपस्थित केला होता. राज्यात 72 हजार नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग 33 टक्के मजूर संस्था, 33 टक्के सुशिक्षित बेरोजगार आणि 33 टक्के खुल्या वर्गातून निविदा काढण्यात येणार आहेत.

 सुशिक्षित बेरोजगारांसाठी आरक्षित असलेल्या निविदा या अभियंत्याना देण्यात येतील. असाच नियम जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिकामध्ये लागू करण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंते खुल्या गटातील स्पर्धेतही निविदेत सहभागी होऊ शकणार आहेत. मजूर संस्थांमध्येही सुशिक्षित बेरोजगारांना निविदा भरता याव्यात त्यावर शासन निर्णय घेत असल्याचे प्रवीण पोटे यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख