चुलत्याच्या पाठिंब्याने पुतण्याला बळ   

Awtade
Awtade

मंगळवेढा :  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांनी आपल्या गटाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर केल्यामुळे चुलत्याच्या पाठिंब्याने पुतण्याला आता बळ आले आहे, त्यामुळे पंढरपूर विधानसभा निवडणूकीत आणखीन चुरस निर्माण झाली आहे.


येथील  लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय  तालुक्यातील विविध सहकारी संस्था व ग्रामपंचायतीमधील कार्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला .  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे त्यांनी आपला पाठिंबा भाजपाचे उमेदवार खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना दिला होता .

तालुक्यांमध्ये दोन साखर कारखाने, एक सूतगिरणी. कृषी उद्योग संघ, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती जिल्हा परिषद व पंचायत समितीवर वर्चस्व असलेली बबनराव आवताडे  या निवडणुकीत अंतरावर थांबले अशी तालुक्यातील राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू होती.  त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीसाठी निर्णय वळणावर येऊन ठेपली होती. 

गत निवडणुकीमध्ये साखर कारखाना व सूतगिरणी व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वर्चस्व नसताना देखील 43 हजार मताधिक्य मतदारसंघात मिळवून देण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती अशा परिस्थितीत या निवडणुकीत त्यामुळे ते काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता लागली असताना त्यांनी आज आपली कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करून समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला. 

झालेल्या घटनेवर पडदा दाखवून तालुक्याच्या विकासासाठी बबनराव आवताडे यांनी भक्कम आधार दिल्यामुळे आणखीन काय वेगाने विकासाचे काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मंगळवेढ्याच्या बरोबरीने पंढरपूर तालुक्यातील मतदार आपल्याला सहकार्य  करणार आहेत, असे अपक्ष उमेदवार  समाधान आवताडे यांनी सांगितले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com