उमरेडच्या डीव्हीआर चोरी प्रकरणात पीएसआय, नायब तहसीलदार दोषी

निवडणुकीच्या काळात उमरेड येथील आयटीआय कॉलेजमधून चोरी झालेल्या डीव्हीआर, एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक व नायब तहसीलदार यांच्यावर दोष निश्‍चित केले आहे. दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
उमरेडच्या डीव्हीआर चोरी प्रकरणात पीएसआय, नायब तहसीलदार दोषी

नागपूर : निवडणुकीच्या काळात उमरेड येथील आयटीआय कॉलेजमधून चोरी झालेल्या डीव्हीआर, एलसीडी स्क्रीन चोरी प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक व नायब तहसीलदार यांच्यावर दोष निश्‍चित केले आहे. दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आयटीआय परिसरात तात्पूर्ती स्ट्रॉंगरूम तयार केली होती. मतदानानंतर विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम येथे गोळा करण्यात आल्या. त्यानंतर सर्व ईव्हीएम कळमना एपीएमसी
परिसरातील मुख्य स्ट्रॉंगरूममध्ये हलविल्या. दोन-तीन दिवसांत स्ट्रॉंगरूममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे दोन डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरट्यांनी चोरून नेले होते.

पोलिसांनी कुणालाही न सांगता सुरक्षा काढून घेतली. स्ट्रॉंगरूमची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. तब्बल 12 दिवसांनंतर चोरीची तक्रार करण्यात आली. ही तक्रार महसूल यंत्रणेकडून न करता खासगी सुरक्षारक्षकाच्या माध्यमातून करण्यात आली.

चोरीच्या तक्रारीत एकच डीव्हीआर नमूद केला होता आणि चोरट्यांनी दोन डीव्हीआर परत केले. त्यानंतर दोन डीव्हीआर चोरीला गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेला दीड महिन्याचा कालावधी होत असताना चोर आणि दोन एलसीडी स्क्रीन मिळाले नसल्याचे सांगण्यात येते.

रामटेक येथील कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे याची तक्रार केली. त्यानंतर चौकशी पथकाने परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. यात पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला होता. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मागविला. यात प्रकरणासाठी पोलिस निरीक्षक आणि स्ट्रॉंगरूमची जबाबदारी असलेल्या नायब तहसीलदार यांना जबाबदार धरण्यात आले. दोघांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता त्यांना दोषींना काय शिक्षा होते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com