umred dvr theft | Sarkarnama

उमरेडच्या डीव्हीआर चोरी प्रकरणी एसडीओ, तहसीलदारांची विभागीय चौकशी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जुलै 2019

नागपूर : उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरण अधिकाऱ्यांना चांगलचे भोवले आहे. मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि एका नायब तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांची एक वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पोलिस विभागाने विभागीय चौकशी सुरू न केल्याने एक प्रकारे आयोगाच्या निर्देशाची अवहेलना केल्याचे बोलल्या जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघात मतदान झाल्यावर इव्हीएम ठेवण्यासाठी उमरेड येथील आयआयटीच्या परिसरात तात्पुर्ती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली होती. येथून इव्हीएम कळमना येथील मुख्य स्ट्रॉंग रूम येथे हलविण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील स्ट्रॉंगमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि एलसीडी स्क्रीन चोरीचे गेल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी 12 दिवसानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. तक्रारीत एक डीव्हीआरचा उल्लेख होता. चोरट्यांनी मात्र दोन डीव्हीआर दिले. एलसीडी स्क्रीन मात्र मिळाली नाही. कॉंग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाचे दोन सदस्यीय पथक तपासणी करण्यासाठी आले. तपासणीत त्यांना महसूल आणि पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणा लक्षात आला. तसा अहवाल मुख्य निवडणूक आयोगला दिल्याची माहिती आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी स्ट्रॉंग रूमची जबाबदारी असलेल्या नायब तहसीलदाराची विभागीय चौकशी प्रस्तावित केली. त्यानंतर आता मुख्य निवडणूक आयोगाने एसडीओ, तहसीलदार आणि नायब तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक यांची विभागीय चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख