उल्हासनगरमध्ये भाजपचे दहा नगरसेवक फोडून शिवसेनेचा महापौर

निवडणुकीत भाजपचे दहा नगरसेवक फुटले आहेत.
ulhasnagar mayor
ulhasnagar mayor

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपचे दहा नगरसेवक फोडून शिवसेनेने महापौर पद मिळवले आहे .  शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांची महापौर पदी निवड झाली आहे .  


तर  उपमहापौरपदी आरपीआयचे भगवान भालेराव यांची निवड झाली आहे .

उल्हासनगर मधील भाजपची  सत्ता गेली आहे  .  राज्यात सत्तांतर होणार हे स्पष्ट होताच भाजपचे बहुमत असूनही उल्हासनगरचे सत्ता शिवसेनेकडे आली आहे .

आर पी आय,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि टीम ओमी कलानी या सर्व पक्षानी शिवसेनेला  मतदान  केले . महाविकास आघाडीचा झेंडा या निमित्ताने उल्हासनगरवर फडकला आहे .

शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांची महापौरपदी निवड झाली असून त्यांनी  भाजपच्या जीवन ईदनांनी यांचा पराभव  केला  आहे .  आशान यांना  43 मते तर ईदनांनी यांना 35 मते पडली.  शिवसेनेनं भाजपाचा 8 मतांनी  पराभव केला आहे .  

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आर पी आय चे भगवान भालेराव यांना 44 मते  पडली तर भाजपच्या विजय पाटील यांना 34 मते  पडली .

निवडणुकीत भाजपचे दहा नगरसेवक फुटले आहेत.  राष्ट्रवादीतून
 महापालिका  निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये  दाखल झालेले ओमी कलानी यांनी भाजपला पराभवाचा झटका दिला असे मानले जात आहे .

भाजपने विधानसभा निवडणुकीत ओमी कलानी यांना तिकीट दिले नव्हते . त्याचा  वचपा कलानी यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत काढला असे मानले जात आहे .

निवडणुकी वेळी भाजपा आमदार रविंद्र चव्हाण,खासदार श्रीकांत शिंदे,शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे ,शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आदी नेते हजर होते .


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com