उल्हासनगरला ऑनलाइन कंपन्या का माल पाठवत नाहीत ? व्यापाऱ्यांचा फंडा काय ?  

असा प्रकार झाल्यामुळे एका कंपनीने कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय उल्हासनगरच्या 421003 या पिनकोडवर देणे बंद केल्याचे दिपक छतलानी यांनी सांगितले.
Ulhasnagar-Kalani.
Ulhasnagar-Kalani.

उल्हासनगर : ऑनलाइन कंपन्यांनी जाळे पसरल्याने ऐन दिवाळीत उल्हासनगरातील बाजारपेठात दरवर्षीची गर्दी ओस पडताना दिसत आहे.या प्रकाराने एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी ऑनलाइन कंपन्यांना धडा शिकवण्यासाठीअजब फंडा स्वीकारला आहे .

 बुकिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय स्वीकारायचा आणि  वस्तूची डिलिव्हरी दरवाज्यात आल्यावर पैसे नसल्याचे कारण देत वस्तू स्वीकारायची नाही असा फंडा उल्हासनगरच्या उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी स्वीकारला आहे . 

उल्हासनगर शहरात 25 हजार व्यापारी आहेत. विविध वस्तू विक्री करणारे 48 बाजार आहेत. हे 48 बाजार उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या अंतर्गत येतात. या सर्व व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा दिवाळी सणात बाजार थंड आहे. दिवाळी सणानिमित्त होणारी खरेदीची लगबग दिसेनाशी झाली आहे. उल्हासनगर शहरातील व्यापार आणि उद्योगधंद्यांना उतरती कळा लागण्यामागे होणारी ऑनलाईन खरेदी असल्याने व्यापार हताश झाले आहेत.

त्यावर तोडगा उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या संघटनेने मंगळवारी दुपारी कॅम्प ३ येथील रिजेन्सी हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर पंचम कलानी,यूथ आयकॉन ओमी कलानी, युटीएचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष पितु राजवानी,अजित माखीजानी,पप्पू बेहरानी, दिपक छतलानी, राम तनवाणी, दिनेश लेहरानी,कमलेश निकम,इलेकट्रोनिक आणि मोबाईल असोसिएशनचे व्यापारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी भागातील व्यापारी संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.

दिपक छतलानी यांनी ऑनलाईन व्यापारामुळे करोडो रुपयांची गुंतवणूक दुकान आणि वस्तूंमध्ये करून बसलेले व्यापारी देशोधडीला लागले असल्याचे सांगितले. यासाठी मागील आठवड्याभरापासून या व्यापाऱ्यांनी बड्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांचे  महागडे टिव्ही, फ्रिजची ऑनलाईन मागणी बड्या कंपनीच्या अँपवर करण्यास सुरुवात केली आहे.

ही मागणी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय  स्विकारला जातो. जेंव्हा  ही  महागडी वस्तू कुरिअर मार्फत घरी येते तेंव्हा आज पैसे नाहीत, उद्या या असे सांगून परत पाठवली जाते. पुन्हा दुसऱ्या दिवशी वस्तू आल्यावर असाच प्रकार केला जातो. यामुळे वस्तूच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने अखेर कंपनीचे ऑर्डर रद्द करते.

 असा प्रकार झाल्यामुळे एका  ह्या कंपनीने कॅश व डिलिव्हरी हा विकल्प उल्हासनगरचा 421003 हा पिनकोड बंद केल्याचे छतलानी यांनी सांगितले. हा मोठा विजय असून हीच नीती वापरून धडा शिकवा असे आवाहन छतलानी यांनी केले.

ऑनलाईन व्यापाराचा निषेध करताना उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यासाठी वेब पोर्टल आणणार असल्याचे ओमी कलानी यांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com