उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक नसलेल्या पक्षांच्या गटनेत्यांच्या पाट्या 

एकही नगरसेवक निवडून न आलेल्या पक्षाच्या गटनेत्यांच्या नावाच्या पाट्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यांपासून दिसणाऱ्या या पाट्यांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने पालिकेचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक नसलेल्या पक्षांच्या गटनेत्यांच्या पाट्या 

उल्हासनगर : एकही नगरसेवक निवडून न आलेल्या पक्षाच्या गटनेत्यांच्या नावाच्या पाट्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यांपासून दिसणाऱ्या या पाट्यांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने पालिकेचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

2012 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव नगरसेवक म्हणून रवींद्र दवणे आणि बहुजन समाज पक्षाचे विजय तायडे, शैलजा सोनताटे निवडून आले होते. कोणत्याही पक्षाचा एक जरी नगरसेवक निवडून आला, तरी गटनेत्याची नोंद करून त्याला स्वतंत्र दालन, लिपिक, शिपाई अशा सोई पालिकेतर्फे दिल्या जातात. फेब्रुवारी 2017 ला पालिकेच्या झालेल्या निवडणुकीत मनसे आणि बसपाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, तरीही विविध दालनांकडे जाणाऱ्या बाणाच्या संकेतस्थळासोबत लावण्यात आलेल्या पाट्यांमध्ये मनसे आणि बसपच्या गटनेत्यांच्या पाट्याही आहेत. त्यात रिपाइं गटनेते ही पाटीही आहे. 

रिपाइं (आठवले) चे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत. रिपाइं गटनेत्याला दुसऱ्या विंगमध्ये दालन देण्यात आले आहे; मात्र महापौर, सभागृहनेते, स्थायी समितीच्या विंगमध्ये रिपाइं गटनेत्याचे दालन असल्याचे बाणाने दर्शविण्यात आलेले आहे. महासभा असो की, कोणतीही बैठक या पाट्यांखालीच लोकप्रतिनिधी चर्चासत्रात रंगतात; मात्र डोक्‍यावर असणाऱ्या पाट्या 10 महिन्यांपासून कुणालाच कशा दिसल्या नाहीत? याबाबत आश्‍चर्य वाटत आहे. 

कुण्या पक्षाचा नगरसेवक नसल्यास त्या पक्षाच्या गटनेत्याच्या नावाची पाटी काढून टाकण्याची जबाबदारी पालिकेच्या भांडार विभागाची आहे. मूळ जागेवर असणारी दालने बदलली, तरी तशी जुनी पाटी काढून नवी पाटी लावण्याची जबाबदारीही याच विभागाची आहे, असे असताना भांडार विभाग या जुन्या आणि नगरसेवकच नसलेल्या गटनेत्यांच्या पाट्यांबाबत अनभिज्ञ कसा? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com