उल्हासनगरात भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का?

ओमी कलानी हे भाजपमध्ये प्रवेश करून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची दाट शक्‍यता आहे.
Kalanis
Kalanis

कल्याण :  लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षात उल्हासनगर शहरातील राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला असून, आगामी विधानसभेत या ठिकाणी कमळ फुलविण्याचे मनसुबे भाजपाचे आहेत.

मात्र, वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या पप्पु कलानी यांचे पूत्र ओमी कलानी हे भाजपमध्ये प्रवेश करून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची दाट शक्‍यता आहे. या वृत्ताला ओमी यांनीही दुजोरा दिल्याने आगामी काळात येथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहेत.

उल्हासनगर विधानसभा ही राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, पप्पु कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी या येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारामध्ये त्यांचा फारसा सक्रिय सहभाग दिसला नाही. पुत्राच्या राजकीय भवितव्यासाठी राजकारणातून त्या निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत.

ओमी कलानी हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून कमळ फुलवत या ठिकाणी घड्याळाची टिकटिक कायम थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपाचे माजी आमदार कुमार आयलानी हे सुद्धा येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. लोकसभेच्या वेळी युतीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. त्यामुळे उमेदवारीवरून दोघांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी आवश्‍यक ते संघटन माझ्याकडे असून मतदार यादी व इतर कामांना सुरुवात केली आहे. कमळ चिन्हावर मी निवडणूक लढू शकतो, असे ओमी कलानी यांनी सरकारनामाशी बोलताना  स्पष्ट केले. मात्र, ज्योती कलानी या नेमकी कोणती भूमिका घेणार? याबाबत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणात आगामी काळात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून भाजप पुन्हा राष्ट्रवादीला राजकीय धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com