उल्हासनगर पालिकेत रेकॉर्ड : एका अधिकाऱ्याकडे  36 पदभार

विकास चव्हाण यांच्याकडे मुख्यलेखाधिकारी यासोबतच अतिरिक्त आयुक्त, मुख्यालय उपायुक्त, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहन, भांडार, मालमत्ता, शिक्षण, विद्युत आदी विभागांचा समावेश आहे.
Ulhasnagar.
Ulhasnagar.

उल्हासनगर  : महाराष्ट्र शासन प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पाठवण्यास उदासीन असल्याने उल्हासनगर पालिकेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोश्‍यावर सुरू आहे.असे असतानाच उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर हे प्रकृती कारणास्तव दिर्घ रजेवर गेल्याने मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण या अधिकाऱ्याच्या दोन हातांवर तब्बल 36 पदभार सोपवण्यात आल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

मुख्यलेखाधिकाऱ्याला कोणतेही दुसरे पद देता येत नाही.असा 2006 साली शासनाचा निर्णय आहे.मात्र सध्या एकही उपायुक्त दर्जाचा प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नसल्याने विकास चव्हाण यांच्यावर 36 विभागांचा पदभारांचा भार सोपवण्यात आला आहे.

शासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त,चार सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, सचिव, मुख्य कर निर्धारक, कार्यकारी अभियंता, वैदयकीय अधिकारी आदी महत्वाच्या पदावर प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवले जातात. मात्र मागील काही वर्षांपासून एक उपायुक्ता व्यतिरिक्त उर्वरित पदांवर नियुक्‍त्या करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे पालिकेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रभारी पदभार देण्यात आला आहे. शासनाकडून संतोष देहेरकर हे एकमेव उपायुक्त नेमण्यात आले आहेत.देहरकर तसेच विकास चव्हाण यांच्याकडे प्रत्येकी 16 विभाग सोपवण्यात आले होते. अशात देहरकर यांना हृदय विकाराचा त्रास होऊ लागल्याने ते दिर्घ रजेवर गेले आहेत.

त्यामुळे आयुक्त अच्युत हांगे यांनी सर्वच्या सर्व 36 विभागांच्या पदांचा पदभार विकास चव्हाण यांच्याकडे सोपवला आहे.त्यात मुख्यलेखाधिकारी यासोबतच अतिरिक्त आयुक्त, मुख्यालय उपायुक्त, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहन, भांडार, मालमत्ता, शिक्षण, विद्युत आदी विभागांचा समावेश आहे.दोन हातांवर 36 विभागांचा पदभार सोपवण्यात आल्याने चव्हाण यांच्यावर कामाचा बोजा आला आहे.

याबाबत पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना विचारले असता त्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी प्रधान सचिवांकडे पत्र व्यवहार केला असल्याचे सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com