udyanrajes bell rejected | Sarkarnama

खंडणीप्रकरणी उदयनराजेंचा जामीनअर्ज फेटाळला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 एप्रिल 2017

लोणंद औद्योगिक वसाहतीतील एका उद्योजकास खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधीश ए. एन. शिरशीकर यांनी फेटाळला. जामीन अर्जावर वरच्या न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली आहे.

सातारा : लोणंद औद्योगिक वसाहतीतील एका उद्योजकास खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधीश ए. एन. शिरशीकर यांनी फेटाळला. जामीन अर्जावर वरच्या न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली आहे.

लोणंद स्थित (ता. खंडाळा) कंपनीच्या मालकाकडून खंडणी वसूल करणे, आणखी खंडणी देत नाही म्हणून त्याला जीवे मागण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह खासगी सचिव अशोक सावंत आणि नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अशोक सावंतसह नऊ जणांना अटक करून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणी खासदार उदयनराजेंना न्यायालयाने 23 मार्चला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर दोन तीन सुनावण्या होऊन काल सोमवारी दहा एप्रिलला उदयनराजेंच्या वतीने ऍड. धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. तर सरकार पक्षातफे ऍड. नितीन मुके यांनी म्हणणे मांडले होते. या गुन्ह्यातील आरोपींमध्ये खासदार उदयनराजे यांचा कोणीही पी. ए. नाही. खासदार भोसले यांच्या कुटुंबाला तीनशे वर्षापासून संपूर्ण जग ओळखते, ते कुठेही पळून जाणार नाहीत, असा युक्तिवाद ऍड. पाटील यांनी करत त्यांना जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून जमीन अर्जावर आज निर्णय देण्यात येणार होता. त्यानुसार आज दुपारी जिल्हा न्यायाधीश ए. एन. शिरशीकर यांनी खासदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख