उदयनराजे म्हणाले, तुम्ही फक्त लंगोट लावून उतरा, बाकीचे मी बघतो!

निवडणुकीत बॅलेट पेपर असेल, तर मतदान करायचे; परंतु 'ईव्हीएम' असेल, तर ते तोडण्याचे प्रात्यक्षिक उदयनराजे दाखवणार आहेत, अशा शब्दांत त्यांनी मतदान यंत्राबाबतचा विरोध दर्शवला.
उदयनराजे म्हणाले,  तुम्ही फक्त लंगोट लावून उतरा, बाकीचे मी बघतो!

कोरेगाव (जि. सातारा) : ''शशिकांत शिंदे यांना मी आमदार करणारच. त्यांनी निवडणुकीच्या मैदानासाठी लंगोट लावावा, समोरच्याच्या लंगोटाचे काय करायचे आणि माझ्या निवडणुकीत खिंडीत अडवणाऱ्यांचे काय करायचे, ते मी बघतोच,'' अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिंदे यांना पाठबळ दिले. 

लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल उदयनराजे यांचा कोरेगाव मतदारसंघातर्फे आमदार शिंदे यांच्या हस्ते वडाचीवाडी (ता. कोरेगाव) येथे सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले,"जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणारे आमदार शिंदे यांच्या पाठीशी राहायचे, की भूल थापा देऊन फसवणाऱ्या विरोधकांच्या मागे जायचे, हे जनतेने ठरवावे. आपण सर्वजण ठाम राहिलात, तर विरोधकांचे डिपॉझिट राहणार नाही." 

आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब सोळसकर, सतीश चव्हाण, राजाभाऊ जगदाळे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास शिवाजीराव महाडिक, मिलिंद कदम, सुनील काटकर, अरूण माने, शाहूराज फाळके, शहाजीराव बर्गे, प्रताप कुमुकले, तेजस शिंदे, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, जयवंत पवार, संजय पिसाळ, अॅड. पांडुरंग भोसले, राहुल साबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com