udyanraje statement in satara melawa | Sarkarnama

दहशत म्हणजे काय हेच मला माहिती नाही! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 मार्च 2019

पक्षाच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. हा उदयनराजेंचा शब्द आहे.

सातारा : उदयनराजेंना निवडूण का द्यायचे, असा प्रश्‍न तुमच्या मनात पडला असेल. पण मी एकच सांगतो, माझ्यापेक्षा तुमचे हित पहाणारा दुसरा उमेदवार असेल तर माझी उमेदवारी माघारी घेईल, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त दिले. 

सातारा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज येथील कल्याण रिसॉल्ट येथे झाला. यावेळी  उदयनराजे म्हणाले,  मी दहशत निर्माण करतो, असे बोलले जाते परंतु मी एकच सांगतो माझ्या विषयी असे का बोलले जाते मला माहित नाही. दहशत म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. गेली 10 वर्षे तुम्ही खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी मनापासून तुमची सेवा करत आलो आहे. माझी निवडणूक झाल्या वर भविष्यात आमदारकीच्या निवडणूका होणार आहेत. त्यावेळी पक्षाच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. हा उदयनराजेंचा शब्द आहे.

मी 'सुपरमॅन किंवा रास्कल' नाही तर तुमचा हितचिंतक आहे. कोणी काही म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही. मी अन्यायाविरोधात लढत आलो आहे, या पुढेही लढत रहाणार आहे. तुम्ही मला सॅल्युट करू नका, मीच तुम्हाला करतो, असे म्हणत नेहमीच्या स्टाईने कॉलर उडवली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख